शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

Kolhapur: घातपात की अपघात?; बेपत्ता झाल्याची तक्रार अन् कार दरीत कोसळल्याचं आलं समोर, दाम्पत्य जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:37 IST

जखमी दाम्पत्य रात्रभर कारमध्येच होते

कोल्हापूर: बहिण आणि दाजी न सांगता निघून गेल्याने त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने भावाने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यानच सातेरी ता. करवीर येथील दरीत कार कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले.दत्तात्रय रघुनाथ पवार (वय ३२ रा. प्रगती कॉलनी, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर) आणि अश्विनी दत्तात्रय पवार (२८) असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे या घटनेमागे घातपात की अपघात असा संशय व्यक्त होत आहे. पाचगाव येथील पवार दाम्पत्य हे करवीर तालुक्यातील सातेरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतताना पवार यांची कार दरीत कोसळली. यात पवार दाम्पत्य जखमी झाले. जखमी अवस्थेतच ते रात्रभर कारमध्ये होते. सकाळी अपघाताची घटना समोर आली. अन् जखमी दाम्पत्यांना कारमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.दरम्यानच, बहिण आणि दाजींचा संपर्क होत नसल्याने अतुल कृष्णा शिंदे (वय ३४ रा. शनिवार पेठ, पाठण कॉलनी, ता. कराड जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. अतुल शिंदे यांनी काल (दि.७) रात्री सांगरुळ (ता. करवीर) येथून दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अन् आज सातेरीच्या दरीत कार कोसळल्याची घटना समोर आल्याने या अपघाताबाबत संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Accident or Sabotage? Couple Injured After Car Falls Into Valley

Web Summary : A Kolhapur couple, missing since Monday, were found injured after their car plunged into a valley near Sateri. Suspicion arises as a missing person report was filed prior to the accident. Police are investigating the incident.