Couple commit suicide under train at Rukdi | रूकडी येथे रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या
रूकडी येथे रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

कोल्हापूर : जिल्ह्यातील रूकडी येथे रेल्वे रूळाखाली जोडप्यांने आत्महत्या केली. यामध्ये हे विवाहीत जोडपे असावे,असा प्राथमिक अंदाज आहे.

सकाळी कोल्हापूरहून सुटणाऱ्या हैद्राबाद गाडीखाली या दांपत्याने आत्महत्या केली असल्याचा कयास असून, यामध्ये धडापासून शरीर वेगळे झाले होते.  रूकडी रेल्वे स्थानकपासून अर्धा किलोमिटर लांब हातकणंगले बाजूला देसाई विहीरनजीक ही घटना घडली. अदयाप रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले  नसल्याने याची नोंद  रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये झालेली नाही. 


Web Title: Couple commit suicide under train at Rukdi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.