लाचखोर पोलीस बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:08+5:302021-01-20T04:26:08+5:30
फसवणूक प्रकरणात आलेल्या तक्रारीचा तपास गतीने करण्यासाठी एका वृद्धाकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने सापळा ...

लाचखोर पोलीस बडतर्फ
फसवणूक प्रकरणात आलेल्या तक्रारीचा तपास गतीने करण्यासाठी एका वृद्धाकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने सापळा रचला होता. संशयित पोलिसाने लाचेची रक्कम एका चहावाल्याकडे देण्यास संबंधित वृद्धाला भाग पाडले होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चहावाल्या पंटरला पकडले होते. त्यावेळी त्या पंटरने अजीज शेख या लक्ष्मीपुरीतील पोलिसाने पैसे घेण्यास सांगितले, त्यानुसार ते स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे कबूल केले होते. हे प्रकरण जानेवारी २०२० दरम्यान घडले. याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत अजीज शेख दोषी आढळल्याने मंगळवारी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी त्याला बडतर्फ करण्याचे आदेश दिले, तर अजीज मुल्लाणी या पोलिसाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.