शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना लागले दिल्लीचे वेध

By admin | Updated: November 7, 2014 00:08 IST

सत्ताधाऱ्यांत खळबळ : निमित्त निवडणुकीचा पैरा फेडण्याचे, प्रत्यक्षात मोट बांधण्याची तयारी

कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नगरसेवकांनी केलेल्या मदतीचा पैरा फेडण्याच्या निमित्ताने नगरसेवकांची मोट बांधण्याची तयारी महापालिकेत सुरू आहे.नगरसेवकांना नोव्हेंबर अखेरीस ‘दिल्ली वारी’चे आवतण आल्याने सत्ताधारी नगरसेवकांत खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी अशा प्रलोभनास बळी पडू नये, यासाठी नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली असल्याची चर्चा महापालिकेत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेतही सत्तांतराचा डाव आखला जात असल्याची कुजबुज महापालिकेच्या चौकात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या मूकसंमतीने जनसुराज्य-भाजप-शिवसेना-अपक्षांची मोट बांधत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची ही व्यूहरचना आहे. कागदोपत्री सत्तांतराचे गणित अगदी जमत असले तरी प्रत्यक्षात याबाबत ‘पहले आप, पहले आप’अशीच परिस्थिती आहे. सत्तांतराच्या गाडीला हवा देण्यासाठीच ‘दिल्ली वारी’चे आयोजन केले जाणार आहे.अनेक नगरसेवकांनी या दिल्ली वारीला संमती दिली आहे. काँग्रेसमधील किमान आठ ते दहा नगरसेवक सहलीसाठी इच्छुक आहेत. सत्तांतराच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करणारी ही नगरसेवकांची संभाव्य दिल्ली वारी उधळण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी उद्या, शुक्रवारी किंवा शनिवारी नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)