शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोल्हापुरात पुढील आदेश लागू होईपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 22:05 IST

Coronavirus Update : कोल्हापुरात स्तर 4 चे नियम लागू राहणार. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा.

ठळक मुद्देकोल्हापुरात स्तर 4 चे नियम लागू राहणार.आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या स्तर - 4 चे निर्बधास पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच यापूर्वी जिल्ह्यासाठी जे निर्बंध होते ते कायम आहेत, संपूर्ण जिल्हयात स्तर - 4 चे निर्बध पुढील आदेश होईपर्यत लागू राहतील असे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले. कोविड-19 विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असताना यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या निर्बधाबरोबरच खालील नमूद विशेष उपाययोजनेबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिले आहेत.

लसीकरणाबाबत सार्वजनिक जनजागृती करणे, लसीकरणास पात्र लोकसंख्येच्या जास्तीत जास्त 70 टक्क्यांपर्यंत लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे, कामाच्या ठिकाणी उपस्थित कामगारांचे (ब्लू कॉलर कामगार) लसीकरण करणे व त्यांना लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहित करणे, कोविड-19 विषाणू संसर्ग रोखणेसाठी चाचणी/शोध/उपचार या पध्दतीचा प्रभावी वापर, कामाच्या ठिकाणी कोविड-19 विषाणू प्रतिबंध उपाययोजना करत असताना सुरक्षित कामाच्या जागा निश्चित करून संबंधित आस्थापनांनी योग्य वायू विजन योजना करावी, असे सांगण्यात आले.

भरारी पथकामार्फत कारवाईमोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात याव्यात आणि यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागास अभिप्रेत असलेली आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी वाढविण्यात यावी. कोविड-19च्या नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल असे कार्यक्रम / उपक्रम / परिषदा / मेळावे घेण्यात येवू नयेत. प्रतिबंधात्मक क्षेत्रे शासनाच्या निर्देशाप्रमाणे नियमानुसार निश्चित करावीत, जेणेकरुन लहानातलहान क्षेत्रामध्ये तसेच संसर्गीत क्षेत्रामध्ये निर्बंध लादणे सोईचे होईल. कोविड-19 योग्य वर्तणूकीचे पालन केले जाईल याची पाहणी करणेसाठी भरारी पथके नेमणेत यावीत. त्यांच्या मार्फत विशेषत: लग्नसमारंभ, रेस्टॉरंट, मॉल या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. कोव्हीड -19 बाबत योग्य वर्तणूकीचे पालन न करणाऱ्यांवर नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात यावी. 

सोमवारपासून सुधारित नियमState Level Trigger अंतर्गत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडील पुढील आदेशा नुसार निर्बधाचे स्तर ठरविण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात येईल. जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेली पॉझिटीव्ह पेशंटच्या संख्येनुसार ठरविण्याबाबत कार्यवाही केली जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे सार्वजनिक आरोग्य विभाग, यांच्याडून प्रसिध्द केली जाणारी आकडेवारी आणि State Level Trigger अंतर्गत देण्यात आलेले आदेशनुसार निर्बधाचे स्तर निश्चित करण्यात येईल. निर्बंधाचा स्तर कमी करत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हयातील मागील दोन आठवडयाची कोविड संसर्गित रुग्णांच्या संख्येचा कल विचारात घेवून निर्णय घेण्यात येईल. निर्बंध पातळीवर काही बदल झाल्यास पुढील सोमवार पासून सुधारीत निर्बंध अंमलात येतील.

कायदेशीर कारवाई होणारआदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस