शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : माफक दरात मिळणार ‘व्हेंटिलेटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:48 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील मेकॅनिकल इंजिनिअर पुष्कराज अनिल जनवाडकर यांनी माफक दरातील व्हेंटिलेटरच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्याचे प्रारूप तयार केले आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या निर्मितीची प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होणार आहे.

ठळक मुद्देमाफक दरात मिळणार ‘व्हेंटिलेटर’कोल्हापुरातील पुष्कराज जनवाडकर यांची निर्मिती

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमधील व्हेंटिलेटरची आवश्यकता लक्षात घेऊन कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील मेकॅनिकल इंजिनिअर पुष्कराज अनिल जनवाडकर यांनी माफक दरातील व्हेंटिलेटरच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्याचे प्रारूप तयार केले आहे. आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या निर्मितीची प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू होणार आहे.तपासणीसाठीची यंत्रसामुग्री (टेस्टिंग इक्विपमेंट) तयार करणाऱ्या कोल्हापूरमधील त्यांच्या व्हर्सटाईल इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या व्हेंटिलेटरचे प्रारूप तयार केले आहे. बी.ई. मेकॅनिकल असणाऱ्या पुष्कराज आणि त्यांच्या कंपनीतील अन्य सहकाऱ्यांनी आठवड्याभरात व्हेंटिलेटरची विविध १४ डिझाईन्स् तयार केली आहेत.

त्यासाठी इंटेन्सिव केअर, रुग्णांचे स्थलांतरण, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वापर आणि आंतरराष्ट्रीय निकष विचारात घेतले आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर या व्हेंटिलेटर निर्मितीचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाणार आहे. माफक दरात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याने कोरोना विरोधातील लढ्यासाठी मोठी मदत होणार आहे.व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी विचारात घेतलेले निकषफुफ्फुसामध्ये जाणारी हवा, मिनिटात घेतले जाणारे श्वास, जास्तीत जास्त प्राणवायू मिळण्यासाठी लागणारे फुफ्फुसातील प्रेशर (पीप) आणि प्राणवायू हे कमी जास्त करण्याची सुविधा या निकषांचा विचार संंबंधित व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी केला आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटरच्या सध्याच्या उपलब्धता, दर लक्षात घेऊन माफक दरात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्याभरात काम केले. त्यातून व्हेंटिलेटरची १४ प्रारूप तयार केली. त्याची चाचणी घेतली असून चांगले परिणाम दिसून आले. आठ ते दहा हजार रुपये आणि ४५ हजार रुपये अशा दोन प्रकारातील व्हेंटिलेटरच्या निर्मिती करण्यात येईल. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या परवानगीसाठी व्हेंटिलेटरचे प्रारूप येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहेत. ही परवानगी मिळाल्यानंतर रोज किमान पाचशे व्हेंटिलेटर तयार करण्यात येणार आहेत.- पुष्कराज जनवाडकर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर