CoronaVirus : कोल्हापूरला दिलासा ! जिल्ह्यात १३०८ अहवाल निगेटिव्ह; एकही पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:53 IST2020-05-26T18:47:33+5:302020-05-26T18:53:42+5:30

जिल्ह्यात आज सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत १३०८ प्राप्त अहवालापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून आज सायंकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. यामध्ये सिंधुदुर्गच्या २० अहवालांचा समावेश आहे.

CoronaVirus: Consolation to Kolhapur! 1308 negative reports in the district; None positive | CoronaVirus : कोल्हापूरला दिलासा ! जिल्ह्यात १३०८ अहवाल निगेटिव्ह; एकही पॉझिटिव्ह नाही

CoronaVirus : कोल्हापूरला दिलासा ! जिल्ह्यात १३०८ अहवाल निगेटिव्ह; एकही पॉझिटिव्ह नाही

ठळक मुद्देकोल्हापूरला दिलासा ! जिल्ह्यात १३०८ अहवाल निगेटिव्ह एकही पॉझिटिव्ह नाही

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळपर्यंत १३०८ प्राप्त अहवालापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून आज सायंकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७८ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. यामध्ये सिंधुदुर्गच्या ३१ अहवालांचा समावेश आहे.

 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-३२, भुदरगड- ४९, चंदगड- २५, गडहिंग्लज- १३, गगनबावडा- ६, हातकणंगले- ४, कागल- ११, करवीर- ११, पन्हाळा- २०, राधानगरी- ४८, शाहूवाडी- ११९, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२० असे एकूण ३७३ आणि पुणे -१, सोलापूर-१, कर्नाटक-१ आणि आंध्रप्रदेश-१, इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ३७८ रुग्णांची आज सकाळी १० वाजल्यापर्यंत जिल्ह्यात संख्या आहे.

Web Title: CoronaVirus: Consolation to Kolhapur! 1308 negative reports in the district; None positive