हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे कोरोना योध्द्‌यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:01+5:302021-02-05T07:16:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाने माणसाला जगायचं आणि जगवायचं कसं, हे शिकविलं. पूर्वजांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी दिल्या ...

Corona Warriors felicitated by Hausabai Pawar Trust | हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे कोरोना योध्द्‌यांचा सत्कार

हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे कोरोना योध्द्‌यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाने माणसाला जगायचं आणि जगवायचं कसं, हे शिकविलं. पूर्वजांनी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत; आपण मात्र आपल्या मातीशी असणारी नाळ हरवत चाललो आहोत, असे मत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी व्यक्त केले.

सौ. हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे कोरोना योध्द्‌यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख होते. यावेळी डॉ. स्वप्ना मिलिंद गायकवाड (वैद्यकीय सेवा), डाॅ. प्रांजली प्रकाश कांबळे (आरोग्य), सौरभ विलासराव निकम (सामाजिक), युवराज राजाराम पाटील (पत्रकारिता), रवींद्र शंकरराव लाड (वृत्तपत्र विक्रेते), चंद्रशेखर प्रकाश आमते (औषध सेवा) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डाॅ. स्वप्ना गायकवाड यांच्याकडील रुग्णांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिग्विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. पद्मजा पवार यांनी आभार मानले.

--

फोटो नं २८०१२०२१-कोल-हौसाबाई पवार ट्रस्ट

ओळ :

कोल्हापुरातील हौसाबाई पवार ट्रस्टतर्फे कोरोना योध्द्‌यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. जे. के. पवार, प्रशांत सातपुते यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

---

Web Title: Corona Warriors felicitated by Hausabai Pawar Trust