शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

corona virus : नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 1:33 PM

CoronaVirus, kolhapur news, cprhospital कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नव्या रुग्णांपेक्षा उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आधिक दिसून आली.

ठळक मुद्देनवे रुग्ण २४० : दिवसभरात डिसचार्ज ३७७ रुग्णसंख्या वाढ घसरली

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नव्या रुग्णांपेक्षा उपचाराअंती बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आधिक दिसून आली. त्यामुळे दिवसभरात नव्या २४० रुग्णांची भर पडली तर ३७७ रुग्णांना डिसचार्ज दिला. डिसचार्ज दिलेल्यांची एकूण संख्या ३५,६०३ झाली. सद्यस्थितीत ८५०३ रुग्णावर उपचार सुरु आहेत.रविवारी चोवीस तासात आजरा, शाहुवाडी तालुक्यात प्रत्येकी एक, शिरोळमध्ये दोन, राधानगरीमध्ये तीन, पन्हाळ्यात चार, गडहिंग्लजमध्ये सहा नव्या रुग्णांची नोंद झाली, गगणबावडा तालुक्यात एकही रुग्ण वाढला नाही हे दिलासादायक चित्र आहे.

भुदरगडमध्ये १४, चंदगडमध्ये १२, हातकणंगलेमध्ये २२, कागलमध्ये १०, करवीरमध्ये ४६ तर कोल्हापूर शहरात ७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झपाट्याने वाढलेल रुग्णसंख्या ही पंधरा दिवसात तितक्याच झपाट्याने खाली आली आहे. त्यामुळे नव्या रुग्णसंख्या वाढीचा वेग पूर्णपणे मंदावला आहे. दिवसभरात दहा जणाचा मृत्यू झाल्याने मृत्यूसंख्या १४८९ वर पोहचली आहे.नव्या चाचण्या घटल्या...दिवसभरात प्राप्त ७०० आरटीपीसीआर चाचण्याच्या अहवालापैकी १०१ पॉझिटिव्ह आले तर ५९४ अहवाल निगेटिव्ह आले. २५७ ॲन्टीजेन चाचण्यापैकी ३२ पॉझिटिव्ह प्राप्त झाले. तर खासगी रुग्णालयातून १०७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.दहा जणांचा मृत्यू; कोल्हापूर शहरात निरंकगेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरात एकाही कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला नाही. तर जिल्ह्यात पाच पुरुष व पाच महिलांचा मृत्यू झाला. त्यामध्ये राजापूरवाडी (ता. शिरोळ), एकता नगर (कागल), हळदी (ता. कागल), वळीवडे (ता. करवीर), संभापूर (ता. हातकणंगले), इचलकरंजी, नेज, चावरे (ता. हातकणंगले), कवळकट्टी (ता. चंदगड), पन्हाळा (ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे.

  • नवे रुग्ण वाढ-२४० (एकूण रुग्णसंख्या :४५५९५)
  •  दिवसभरात डिसचार्ज - ३७७ (एकूण डिसचार्ज : ३५६०३)
  • दिवसभरात मृत्यू - १० (एकूण मृत्यू : १४८९)
  • सद्यस्थितीत उपचार सुरु - ८५०३ 

तालुकानिहाय संख्या...

आजरा- ७९९, भुदरगड- ११३९, चंदगड- १०६५, गडहिंग्लज- १२९७, गगनबावडा-१३०, हातकणंगले- ४९९३, कागल - १५६६, करवीर- ५३०३, पन्हाळा- १७५५, राधानगरी- ११८२, शाहूवाडी- १२१६, शिरोळ- २३५३, नगरपालिका- ७००४, कोल्हापूर शहर- १३८०४, इतर जिल्हे / राज्य-१९८९ (एकूण रुग्णसंख्या- ४५५९५, मृत्यू- १४८९)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर