corona virus : नॉन कोविड रूग्णांची हेळसांड नको : शरद मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:04 PM2020-09-12T13:04:19+5:302020-09-12T13:07:39+5:30

कोरोना महामारीच्या काळात प्रसुतीसाठी येणाºया गर्भवती महिला आणि नॉन कोविड रूग्णांची हेळसांड होवू नये हे कटाक्षाने पहावे आणि कोविडसंदर्भातील सर्व प्रकारची काळजी घेवून रूग्णांवर वेळेत उपचार करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

Corona virus: Don't take care of non-covid patients: Sharad Magar | corona virus : नॉन कोविड रूग्णांची हेळसांड नको : शरद मगर

गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत गटविकास अधिकारी शरद मगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभापती रूपाली कांबळे, डॉ. दिलीप आंबोळे, विद्याधर गुरबे उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनॉन कोविड रूग्णांची हेळसांड नको : गटविकास अधिकारी शरद मगर गडहिंग्लज येथील बैठकीत वैद्यकिय अधिकाऱ्यांना सूचना

गडहिंग्लज : कोरोना महामारीच्या काळात प्रसुतीसाठी येणाºया गर्भवती महिला आणि नॉन कोविड रूग्णांची हेळसांड होवू नये हे कटाक्षाने पहावे आणि कोविडसंदर्भातील सर्व प्रकारची काळजी घेवून रूग्णांवर वेळेत उपचार करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.

उपजिल्हा रूग्णालय  कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे गडहिंग्लजसह परिसरातील गर्भवती महिलांच्या प्रसुतीसह इतर आजारांच्या रूग्णांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर जनआरोग्य सुविधा असणाऱ्या दवाखान्याचे प्रतिनिधी व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रूपाली कांबळे होत्या. पं. स. सदस्य विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मगर म्हणाले, गर्भवती महिलांची प्रसुती सुखरूप व्हावी यासाठी पुढील दोन महिन्यात प्रसुत होणाºया गर्भवतींची यादी तयार करून संबंधित रूग्णालयांकडे पाठवावीत. त्या गर्भवतींची प्रसुतीपूर्वी १५ दिवस कोविड चाचणी आणि प्रसुतीच्या आधी अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात यावी.

एखादी गर्भवती महिला कोरोनाबाधित आढळून आल्यास तिची प्रसुती उपजिल्हा रूग्णालयातच किंवा प्रसंगी सीपीआरला पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. खाजगी दवाखान्यांनीदेखील कोविडच्या कारणावरून गर्भवती व अन्य रूग्णांची हेळसांड होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

बैठकीस वैद्यकिय अधिक्षक डॉ. दिलीप आंबोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जून अथणी, संत गजानन महाराज संस्था समूहाचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, केदारी रेडेकर संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरूद्ध रेडेकर उपस्थित होते.

 याठिकाणी प्रसुतीची सोय

म. फुले जनआरोग्य योजनेची सुविधा असणाºया दवाखान्यांवर गर्भवतींच्या प्रसुतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चंदगडसह महागाव, नेसरी आणि मुंगूरवाडी परिसरातील गर्भवतींची प्रसुती महागाव येथील संत गजानन महाराज रूरल हॉस्पिटलमध्ये तर आजऱ्यासह गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव, हलकर्णी व नूल परिसरातील गर्भवतींच्या प्रसुतीची व्यवस्था शेंद्री माळावरील केदारी रेडेकर धर्मादाय दवाखान्यात करण्यात आली आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याचेही मगर यांनी सांगितले.

 आॅक्टोबरअखेर प्रसुत होणाऱ्या महिलांची संख्या प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय अशी - कडगाव ७५, महागाव ३३, हलकर्णी ४७, नेसरी २६, नूल ५०, मुंगूरवाडी २३


 

Web Title: Corona virus: Don't take care of non-covid patients: Sharad Magar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.