शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:10 IST

जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी १४ जण सापडले. त्यांचे स्रावचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९८० वर जाऊन पोहोचली. कोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सोमवारी रात्री कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा तालुक्यातील पाच, चंदगड व हातकणंगले तालुक्यांतील प्रत्येकी तीन, गडहिंग्लजच्या दोन, तर भुदरगडच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचे १४ नवे रुग्णकोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर

कोल्हापूर : जगभर थैमान घातलेल्या कोरोनाच्या विळख्यात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी १४ जण सापडले. त्यांचे स्रावचे अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९८० वर जाऊन पोहोचली. कोल्हापूरच्या रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सोमवारी रात्री कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये आजरा तालुक्यातील पाच, चंदगड व हातकणंगले तालुक्यांतील प्रत्येकी तीन, गडहिंग्लजच्या दोन, तर भुदरगडच्या एका रुग्णाचा समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रविवारी एका दिवसात २५ बाधित रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी १४ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांतूनसुद्धा अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे लॉकडाऊन शिथिल होत असताना रुग्णांची संख्या वाढत असून, ही बाब अधिकच चिंता वाढविणारी आहे.आजरा तालुक्यातील भादवण आणि भादवणवाडी येथील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भादवणवाडीत एकाच घरातील तीन रुग्ण असून, त्यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. भादवणमधील ८५ वर्षांच्या वृद्धास कोरोना झाला, तर त्याच गावातील २३ वर्षांचा एक तरुण बाधित असल्याचे तपासणीत आढळून आले.अलीकडे इचलकरंजी सुद्धा रेड झोन आले असून, सोमवारी इचलकरंजीत तीन रुग्ण आढळून आले. त्याम‌ध्ये कलानगरचे दोन व चंदूरच्या एकाचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील मुधाळतिट्टा येथील ३१ वर्षीय तरुणाला कोरोना झाला. गडहिंग्लज शहरातील दोन रुग्ण बाधित आढळले. चंदगड तालुक्यातही तीन रुग्ण सापडले.सापडलेले रुग्ण तरुण वयाचेसोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत आढळून आलेल्या १४ रुग्णांपैकी भादवणचे ८५ वर्षांचे एक वृद्ध वगळता बाकीचे बारा कोरोनाबाधित रुग्ण हे तीस वर्षांखालील तरुण आहेत. इचलकरंजी शहरातील एक ११ वर्षांच्या मुलगीचाही त्यात समावेश आहे.जिल्ह्यातील रुग्णांची संख्या अशी - आजरा - ९२ , भुदरगड - ७७, चंदगड - ११४, गडहिंग्लज - ११२, गगनबावडा - ७, हातकणंगले - १८, कागल - ५८, करवीर- ३०, पन्हाळा - २९, राधानगरी - ७३, शाहूवाडी - १८७, शिरोळ - १२ , कोल्हापूर शहर - ५९, नगरपालिका ९२ (इचलकरंजी ७०, जयिसंगपूर ५, कुरुंदवाड - ९, कागल -१ शिरोळ -१ हुपरी -१ , पेठवडगाव -१) अन्य राज्यांतील -२० ( पुणे २, सोलापूर ३, मुंबई ४, नाशिक १, सातारा २ , कर्नाटक ७, आंध्र प्रदेश १)

  •  एकूण रुग्ण संख्या - ९८०
  • बरे झालेले रुग्ण - ७४८
  • कोरोनामुळे मृत - १३
  • उपचार घेत असलेले रुग्ण - २१९
  •  सोमवारी घेतलेले स्राव - ५६२
  • तपासणी झालेल्या व्यक्ती - ११०६
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर