शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Kolhapur : लस घेताना मनस्ताप होणार नाही याची खबरदारी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:35 IST

Corona vaccine Kolhapur : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू नयेत, यादृष्टीने लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली.

ठळक मुद्देआमदार जाधव, ऋतुराज पाटील यांच्या सूचना महापालिका प्रशासनासोबत बैठक

कोल्हापूर : लसीकरण केंद्रावर गोंधळ होणार नाही, कोणालाही मनस्ताप सहन करावा लागू नये, लस घेण्याकरिता केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागू नयेत, यादृष्टीने लसीकरणाचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली.कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण तसेच वैद्यकीय बिले यांच्या संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या. कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी का होत नाही, असा प्रश्न करत रुग्णांची वाढ थांबविण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.

शहरातील सरसकट दुकाने उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता प्रशासन व नागरिकांनीही घेतली पाहिजे. कोरोना रुग्ण घरीच अलगीकरण आहेत. अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. हे रुग्ण बऱ्याच ठिकाणी फिरत असल्याने शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनाला आणून दिले.प्रशासनाने निर्बंध कडक करावेत, गृह अलगीकरण बंद करावे, बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करा, कन्टेनमेंट झोन्समध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे का, याची दक्षता घ्या. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा; मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणा, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.लसीकरणामध्ये प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागू नयेत. ज्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशा नागरिकांना महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने फोन करावेत. त्यांना वेळेचे स्लॉट द्या, अशी सूचना आमदार जाधव यांनी केली.यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, डॉ. अमोलकुमार माने उपस्थित होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर