शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा निर्णय मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

कोल्हापूर : अन्य जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजेन ...

कोल्हापूर : अन्य जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या किंवा जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजेन चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने २४ तासाच्या आत मागे घेतला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी सकाळी नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही बंधनाशिवाय कोल्हापुरात प्रवेश करता येणार आहे. मात्र या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवस गृह किंवा संस्थात्मक अलगीकरण सक्तीचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यात सर्वाधिक प्रमाण अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे आहे. यावर पर्याय काढत मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अन्य जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना तसेच जिल्ह्यांतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात राहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना ४८ तासाच्या आत आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याचा आदेश काढला होता. ही चाचणी केलेल्या तसेच न करता परस्पर घरी गेलेल्या नागरिकांचे सात दिवस गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले होते. या सगळ्यावर ग्राम समिती व प्रभाग समितीचे नियंत्रण असेल, असे आदेशात नमूद होते.

मात्र बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सक्तीचा आदेश मागे घेण्यात आला. या आदेशामुळे नागरिकांना अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने तो मागे घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापुरात विनासायास प्रवेश करता येणार आहे. मात्र राज्य शासनाच्या सध्याच्या नियमानुसार अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची स्वॅब तपासणी व सात दिवसांचे अलगीकरण हा नियम कायम ठेवला आहे.

--

गावांमध्ये तंट्याचे कारण

चाचणी प्रमाणपत्र व परगावहून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही, त्यांचे संस्थात्मक किंवा गृह विलगीकरण करायचे का, याचे सर्वाधिकार ग्राम व प्रभाग समित्यांना देण्यात आले होते. त्यामुळे हे वादाचे कारण ठरले असते. शिवाय एक - दोन दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय त्रासाचा ठरला असता.

--