शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरात फिरस्त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST

इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील दत्तनगर परिसरातील एका फिरस्त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फेऱ्या ...

इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील दत्तनगर परिसरातील एका फिरस्त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फेऱ्या माराव्या लागल्याने व त्याला मिळालेल्या वागणुकीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांतून संताप व्यक्त होत आहे.

दत्तनगर परिसरात १५ वर्षांहून अधिक काळ एक फिरस्ता मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. त्याची तब्बेत बिघडल्याची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली. त्यांनी तातडीने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे अ‍ँटिजन तपासणी केल्याशिवाय उपचारासाठी दाखल करता येत नसल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला पुन्हा आयजीएम रुग्णालयात नेले.

दरम्यान, तेथे तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला व्यंकटेश्वरा कोविड केंद्रामध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी पाहिले असता त्याच्या पायाला जखम होती. त्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत त्या कार्यकर्त्याने जाब विचारत संताप व्यक्त केला. अखेर आयजीएम प्रशासनाने फिरस्त्यावर उपचार सुरू केले.