शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -२१ मार्च रोजी सकाळी "महालक्ष्मीने" आलेल्या प्रवाशांनी तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:20 IST

२१ मार्च रोजी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात पोहचलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी सीपीआरमधून करावी. तसेच पुढील १४ दिवस स्वतःला अलगीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले.

ठळक मुद्दे२१ मार्च रोजी सकाळी "महालक्ष्मीने" आलेल्या प्रवाशांनी आपली तपासणी करावीआयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आवाहन

कोल्हापूर- २१ मार्च रोजी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात पोहचलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी सीपीआरमधून करावी. तसेच पुढील १४ दिवस स्वतःला अलगीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले.कोल्हापुरात मंगळवार पेठेतील सापडलेला कोरोना संसर्गित रुग्ण हा पुण्याहून महालक्ष्मी एक्सप्रेसने रात्री निघून तो २१ मार्च रोजी सकाळी ७ वा. कोल्हापुरात पोहचला होता. त्याने जनरल डब्यातून प्रवास केला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी या रेल्वेने प्रवास केलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. तसेच सर्दी, ताप, खोकला, धाप आदी लक्षणे असल्यास त्वरित सीपीआर रुग्णालयात येवून तपासणी करुन घ्यावी.

इतर प्रवाशांना कोणतीही लक्षणे नसली तरीही पुढील १४ दिवसांसाठी कुटुंब किंवा इतर कोणाशीही संपर्क होणार नाही, वस्तुंची देवाण घेवाण होणार नाही, स्वच्छता व अलगीकरणाची सर्व खबरदारी घेवून स्वतः स्वतंत्रपणे अलगीकरणात रहावे, असेही कलशेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर