शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur : डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:19 IST

कोल्हापूर   : येथील कदमवाडीमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तीसरी कोव्हिड-19 तपासणी ...

ठळक मुद्दे डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वितपालकमंत्री सतेज पाटील यांनी केली पाहणी

कोल्हापूर  : येथील कदमवाडीमधील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात कोव्हिड-19 तपासणी लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ही तीसरी कोव्हिड-19 तपासणी लॅब आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या लॅबची आज पाहणी केली.जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून यापूर्वीच शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन लॅब कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. आज कदमवाडीतील डॉ. डी. वाय.पाटील या खासगी रुग्णालयात सुरु झालेल्या कोव्हिड-19 तपासणी लॅबची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील, डॉ. डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुल सचिव संजय जाधव, डॉ. आर.एस.पाटील, डॉ. रोमा चौगुले, व्ही.एस.व्हटकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील आणि जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी लॅबची पाहणी करुन सविस्तर माहिती घेतली.त्याच बरोबर स्वॅब कलेक्शन केंद्राची त्यांनी पाहणी केली. आरटीपीसीआर तंत्रज्ञानाची लॅब कार्यान्वित केली आहे.

या लॅबमध्ये दिवसाला 400 नमुने तपासण्याची क्षमता असून सोमवारी आर.एन.आय एक्स्याक्युटर हे मशीन येणार आहे. त्यानंतर या लॅबची क्षमता दुप्पट होणार आहे, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील