शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

धक्कादायक : मान्यताप्राप्त नसलेल्या किटद्वारे कोल्हापूरात कोरोना तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 3:55 PM

आयसीएमआरने (इंडीयन कौन्सील मेडीकल रिसर्च, नवी दिल्ली) या संस्थेचे मान्यताप्राप्त सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले, पण त्या ऐवजी दुसर्याच किटद्वारे जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उघड केले. त्यांनी माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघडकिस आणला.

ठळक मुद्देप्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांची पत्रकार परिषदेत माहितीमुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

कोल्हापूर : आयसीएमआरने (इंडीयन कौन्सील मेडीकल रिसर्च, नवी दिल्ली) या संस्थेचे मान्यताप्राप्त सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले, पण त्या ऐवजी दुसऱ्याच किटद्वारे जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचे धक्कादायक सत्य प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उघड केले. त्यांनी माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघडकिस आणला.देसाई म्हणाले, केंद्र शासनाच्या भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद, स्वास्थ अनुसंधान विभाग, स्वास्थ और परिवार कल्याण मंत्रालय (आर.सी.एम.आर.) या संस्थेमार्फत किटची तपासणी करुनच जे किट पात्र आहेत, त्याचीच खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी आवश्यक असणारे सव्वा कोटी रुपयांचे १२४ किट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी खरेदी केले. ज्या संस्थेकडून हे किट खरेदी केले, त्या संस्थेच्या बॅच नं. पीपी००००५-सी ०४२०००१ या किटला आय.सी.एम.आर.ने मान्यता दिली आहे. त्याच किटची प्रशासनाने सव्वा कोटी रुपये देऊन खरेदी केली. पण कंपनीने पुरवठा करताना खरेदी केलेल्या मान्यताप्राप्त ऐवजी पीपी००००५-सी ०५२०००४ या प्रमाणित न केलेल्या किट लॅबला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

हे कोरोना चाचणी स्राव घेण्याचे अतिशय महत्वाचे किट असताना ते उपलब्ध झाल्यानंतर त्याची शहानिशा न करता त्याचा कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या शेंडा पार्कमधील लॅबमध्ये वापर सुरु केला आहे. त्यामुळे या मान्यता नसलेल्या १२४ पैकी ७३ किटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सद्या ५१ किट शिल्लक आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर