जयसिंगपुरात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST2021-02-21T04:46:35+5:302021-02-21T04:46:35+5:30

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी पूर्णपणे नाहीसा झाला नाही. असे असताना जयसिंगपूर शहरासह ग्रामीण भागात बाजारपेठा, बसस्थानक यासह ...

Corona infiltration in Jaysingpur | जयसिंगपुरात कोरोनाचा शिरकाव

जयसिंगपुरात कोरोनाचा शिरकाव

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी पूर्णपणे नाहीसा झाला नाही. असे असताना जयसिंगपूर शहरासह ग्रामीण भागात बाजारपेठा, बसस्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. अनेकांच्या तोंडाला मास्क नसते. तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, जयसिंगपुरात कोरोनाचे नव्याने तीन रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. शाहूनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याच कुटुंबातील आणखी सहा जणांचे स्वॅब शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पालिकेने जनजागृती मोहीम सुरू केली असून विनामास्क फिरणाऱ्या २१ जणांवर शंभर रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. नागरिकांनी वेळीच सावध व्हावे, बाजारपेठेतील गर्दी टाळून कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Corona infiltration in Jaysingpur