कोरोनाचे केवळ १५५ रुग्ण शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST2020-12-14T04:37:23+5:302020-12-14T04:37:23+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १९ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र रुग्ण झपाट्याने बरे ...

Corona has only 155 patients left | कोरोनाचे केवळ १५५ रुग्ण शिल्लक

कोरोनाचे केवळ १५५ रुग्ण शिल्लक

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १९ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र रुग्ण झपाट्याने बरे होत असल्याने आता केवळ १५५ रुग्ण उपचार घेत आहेत.

गडहिंग्लज, करवीर, राधानगरी, कोल्हापूर महापालिका क्षेत्रांमध्ये नवे रुग्ण सापडले आहेत; तर आजरा, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, हातकणंगले, कागल, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. दिवसभरामध्ये ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसभरामध्ये ३९७ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ५३० जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. ९४ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील शिवाजी चौकातील ६४ वर्षांच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona has only 155 patients left