कोरोनाचे १३ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:13+5:302021-02-08T04:22:13+5:30

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याची सुवार्ता कानी पडत असतानाच रविवारी एकदम १३ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. यात ...

Corona has 13 new patients | कोरोनाचे १३ नवे रुग्ण

कोरोनाचे १३ नवे रुग्ण

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असल्याची सुवार्ता कानी पडत असतानाच रविवारी एकदम १३ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. यात शहरातील १०, तर करवीर तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी शहरात सहा, तर ग्रामीण भागात एकही नवा रुग्ण सापडला नव्हता. दरम्यान, आता नवे रुग्ण सापडल्यामुळे आतापर्यंतची लागण झालेली रुग्णसंख्या ५० हजार झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४८ हजार १६४ रुग्ण बरे झाले असून, अजून ११५ रुग्ण उपचार घेत आहेत. १७२९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

रविवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ७१८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७०१ अहवाल निगेटिव्ह, तर सात अहवाल पॉझिटिव्ह आले. ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे ५१ प्राप्त अहवालांपैकी सर्व निगेटिव्ह आले. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये ७४ प्राप्त अहवालांपैकी ६८ निगेटिव्ह, तर ६ पॉझिटिव्ह असे एकूण १३ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

Web Title: Corona has 13 new patients