शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या धर्तीवरील ‘कन्व्हेंशनल सेंटर’ रखडल

By admin | Updated: November 28, 2014 00:33 IST

शासनाकडून मान्यता : निधी मिळेना; इंजिनिअरिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठाची दमछाके

संतोष मिठारी - कोल्हापूर -उद्योजकीय संघटनेचा पुढाकार, आरक्षित केलेली पाच एकर जागा, तयार असलेला प्रस्ताव, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळूनदेखील शिवाजी विद्यापीठातील कन्व्हेंशनल आणि एक्झिबिशन सेंटरचा (प्रदर्शन व व्यापारी केंद्र) प्रकल्प निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. सेंटरचा प्रस्ताव व निधी देण्यास राज्य शासनाकडून मान्यता मिळाली. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाला निधी देण्यासाठी शासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे.गुजरात विद्यापीठाच्या धर्तीवर औद्योगिक प्रदर्शनासाठी शिवाजी विद्यापीठात कायमस्वरूपी कन्व्हेंशनल व एक्झिबिशन सेंटर सुरू करण्याची मागणी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या नेतृत्वाखाली उद्योजकांनी विद्यापीठाकडे केली. त्याबाबत एप्रिल २०१२ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीत सेंटरबाबत उद्योजकांशी चर्चा केली. यात त्यांनी सेंटरसाठी लागणारा निधी आणि विद्यापीठाकडे उपलब्ध असल्यास पाच एकर जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यावर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजकांची बैठक घेतली. सुवर्णमहोत्सवी वर्षाची संधी साधत विद्यापीठाने या सेंटरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्याला तत्त्वत: मान्यता देत शासनाने सुवर्णमहोत्सवी निधीअंतर्गत त्यासाठी दहा कोटींचा निधीदेखील देण्याचे मान्य केले. त्यावर टप्प्याटप्प्याने हे सेंटर विकसित करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, निधी, प्रस्ताव तत्त्वत: मान्य होऊन तीन वर्षे उलटली, तरी अद्यापही सेंटरसाठी एक रुपयादेखील विद्यापीठाला मिळालेला नाही. निधी पदरात पाडून घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासन, इंजिनिअरिंग असोसिएशनची पुरती दमछाक होत आहे. घोषणेची ग्वाही, प्रत्यक्षात मदत नाही, अशी या सेंटरबाबतची शासनाची भूमिका उद्योगवाढीला मारक ठरणारी आहे.स्थानिक उद्योजकांना बळ मिळावे, या उद्देशाने या कन्व्हेंशनल आणि एक्झिबिशन सेंटरचा प्रस्ताव मांडला; पण शासनाकडून निधीअभावी सेंटर रखडले. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण उत्पादन बाजारपेठेत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचविण्यासाठी हे सेंटर आवश्यक आहे. त्यामुळे त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे.- रवींद्र तेंडुलकर, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनशिवाजी विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी वर्षासाठीच्या निधीच्या प्रस्तावातून पाठविलेला प्रकल्प, योजनांमध्ये या कन्व्हेंशनल सेंटरचादेखील समावेश होता. मात्र, त्याला अद्यापही शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. निधी व मान्यता मिळविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.- कुलगुरू डॉ. एन. जे. पवार असा होता प्रस्ताव...सुमारे दोन हजार लोकांच्या क्षमतेचे सर्वसोयींनी युक्त अद्ययावत सभागृह, ५० हजार स्क्वेअर फुटांचे बांधकाम, प्रशस्त वाहनतळ, निवास आणि जेवणाची व्यवस्था, असा सेंटरच्या रचनेचा प्रस्ताव तयार आहे. विविध अभियंते आणि विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन त्यांच्याकडून आलेल्या आराखड्यातून हा प्रस्ताव तयार केला. सेंटरसाठी विद्यापीठाच्या कॅम्पस्मधील युको बँकेच्या पलीकडील पाच एकर जागा आरक्षित केली आहे.