शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलशाही आक्रमणाला विरोध करा

By admin | Updated: August 25, 2014 00:08 IST

मोदी सरकार भांडवलदारांचे हित जपते : राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनातील सूर

कोल्हापूर : भांडवलशाही आक्रमक बनली आहे. सत्ताधारीच आक्रमक आहेत असे नाही, तर भांडवलदारवर्गसुद्धा आक्रमक झाला आहे. या धोरणाचा पाडाव करीत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार भांडवलदारांचे हित जोपासत असल्याचा सूर आज, रविवारी राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात उमटला. कामगारवर्गाने लढून मिळवलेले कायदे हे सरकार मोडत असून ते एकप्रकारे भांडवलदारांना पाठबळ देत असल्याची टीका अनेक वक्त्यांनी यावेळी केली.या अधिवेशनाला राज्य सर्व श्रमिक संघाचे जनरल सेक्रेटरी उदय भट, लाल निशाण पक्षा (ले)चे जनरल सेक्रेटरी भीमराव बनसोड, मुक्ता मनोहर, मेधा थत्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्य सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष उद्धव शिंदे अध्यक्षस्थानी होते. दसरा चौकातील कॉ. पी. डी. दिघे नगर, सुशीला कुलकर्णी संघर्ष मंच (शाहू स्मारक भवन ) येथे अधिवेशन झाले. दरम्यान, यावेळी अधिवेशनात विविध ठराव करण्यात आले.अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, भांडवलदारांचे कामगारांवर दिवसेंदिवस आक्रमण वाढत आहे. त्यासाठी राज्यभर आक्रमक आंदोलने उभे करा. भीमराव बनसोड यांनी, आर्थिक प्रश्नाच्या कामकाजासोबत सामाजिक व स्त्रियांवरील अत्याचाराविरोधी काम करणेदेखील हे महासंघाचे धोरण असल्याचे सांगितले.यावेळी उदय भट यांनी, राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा अहवाल सांगितला. खजिनदार बी. के. आंग्रे यांनी आर्थिक अहवाल मांडला. पुणे येथील मुक्ता मनोहर व मेघा थत्ते यांनी, केंद्र सरकार कामगारविरोधी धोरणे अवलंबत आहे. हे सरकार कामगार विरोधी असल्याची टीका केली. अतुल दिघे यांनी स्वागत केले. अधिवेशनाला राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून प्रतिनिधी आले होते. गोपाळ पाटील यांनी आभार मानले.दरम्यान, मंगळवारी (दि.२६) टोल रद्द करणारा अध्यादेश न काढल्याबद्दल बंदला पाठिंबा देणारा, तर पेठवडगाव येथील पोलीस कोठडीमध्ये अत्याचारात मृत पावलेल्या दलित युवकाच्या दोषींना कडक शासन करावे, असा ठराव अधिवेशनात करण्यात आला.