रमाई आवास योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:52+5:302021-02-05T06:53:52+5:30

इचलकरंजी : रमाई आवास योजनेतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच उर्वरित कामाची नव्याने निविदा काढावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक ...

The contractor of Ramai Awas Yojana should be blacklisted | रमाई आवास योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे

रमाई आवास योजनेच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे

इचलकरंजी : रमाई आवास योजनेतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच उर्वरित कामाची नव्याने निविदा काढावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले आहे.

या निवेदनात बावचकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील ९ मार्च २०१०च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी शहरातील १८१ लाभार्थ्यांना नगरपालिका मालकीच्या गट नं. १०२ मध्ये घर बांधण्याचा प्रकल्प मंजूर केल्याचे म्हटले आहे. या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम दोन कोटी ७१ लाख ५० हजार इतकी असून, मुंबई येथील एका कंपनीला हा ठेका दिला आहे. संबंधित कंपनीला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली असून, सहा इमारतींपैकी अजूनही दोन उर्वरित इमारतींचे काम सुरू झाले नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: The contractor of Ramai Awas Yojana should be blacklisted