शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणीच काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:23 IST

कोल्हापूर : अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रकानुसार विविध विभागांनी कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी करावी. ज्या तालुक्याला ज्या ठिकाणी नियुक्ती ...

कोल्हापूर : अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रकानुसार विविध विभागांनी कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी करावी. ज्या तालुक्याला ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली असेल त्याच ठिकाणी उमेदवारांनी काम करावे, विभागांनी जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर हजर होत नसेल अथवा नाकारत असेल तर त्यास काळ्या यादीत टाकावे, असे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

अंशकालीन उमेदवारांबाबत २०१९ व २०२० च्या शासननिर्णयानुसार कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी व रिक्त पदांच्या माहितीबाबत बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, तहसीलदार रंजना बिचकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, विभाग प्रमुखांनी रिक्त पदे भरताना अंशकालीन पदवीधर उमेदवारांमधून कंत्राटी पदे भरावीत. त्याबाबत पत्रव्यवहार करावा. ठेकेदारामार्फत पदे न भरता अंशकालीन पदवीधर उमेदवारांमधून पदभरती करण्याबाबत एस.एस.सी. मंडळाला पत्रव्यवहार करावा. कंत्राटी पदे ही बदलता येण्याजोगी नसल्याने ज्या ठिकाणी नियुक्ती मिळेल त्याच ठिकाणी उमेदवारांनी काम करावे. विभागांनीही भरती प्रक्रिया राबविताना जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर हजर होत नसेल अथवा नाकारत असेल तर त्यास काळ्या यादीत टाकावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

--

फोटो नं १७०३२०२१-कोल-कॉन्ट्रॅक्ट एम्पॉई

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कंत्राटी भरतीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, संजय माळी, रंजना बिचकर, सुजाता शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

--