बांधकाम कामगारांचा उद्या मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST2021-02-21T04:44:47+5:302021-02-21T04:44:47+5:30

कोल्हापूर : बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष कामगार आघाडीच्या वतीने उद्या, सोमवारी मुंबई मंत्रालयावर मोर्चा ...

Construction workers protest on Mantralaya tomorrow | बांधकाम कामगारांचा उद्या मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

बांधकाम कामगारांचा उद्या मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

कोल्हापूर : बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष कामगार आघाडीच्या वतीने उद्या, सोमवारी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे यांनी पत्रकार परिषेदत दिली. कोल्हापुरातून ५००, तर राज्यात ४००० कामगार मोर्चात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागटिळे म्हणाले, बांधकाम कामगारांची ऑनलाइन नोंदणी सुरू केल्यामुळे १७ लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगारांची असणारी नोंदणी केवळ ९ लाख झाली आहे. काही कामगार अल्प शिक्षित असल्यामुळे त्यांना ऑनलाइनने नोंदणी करता येत नाही. पूर्वीप्रमाणेच ऑफलाइनने नोंदणी करण्याचे निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकरातून १० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. त्याच्या व्याजाइतकी रक्कमसुद्धा कामगारांवर खर्च होत नाही. मंडळाकडून सुरू असलेल्या मेडिक्लेम योजना, घरकुल योजना, अवजारे खरेदी योजना बंद करण्यात आल्या. या सर्व योजना सुरू कराव्यात यासह काही मागण्यांसाठी मोर्चा काढत आहे. यावेळी प्रदीप मस्के, अशोक कांबळे, कृष्णात लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Construction workers protest on Mantralaya tomorrow