शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

करवीर मतदारसंघ भाजपलाच हवा

By admin | Updated: July 30, 2014 00:43 IST

कार्यकर्त्यांची मागणी : प्रयाग चिखलीत कार्यकर्त्यांची बैठक

वडणगे : गेली दहा वर्षे आमच्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होऊ लागले आहे. यापुढे हा अन्याय सहन करणार नाही. आमच्या हक्काचा मतदारसंघ आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी मागणी बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा पदाधिकाऱ्यांच्या संत ज्ञानेश्वर समूहाचे संस्थापक पै. संभाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.भाजपचे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९० साली दिलीप भिवटे, १९९५ ला बाबा देसाई, तर १९९९ ला संग्राम गायकवाड यांनी भाजपमधून निवडणूक लढवून चांगली मते मिळविली आहेत. २००४ साली तर भाजपच्या पाठिंब्यावर सतेज पाटील यांनी निवडणूक लढविली व २००९ ला काँग्रेसमधून आलेल्या चंद्रदीप नरके यांनी वरिष्ठ पातळीवरून तिकीट मिळवून भाजपची मदत घेतली.या सर्व घडामोडींनी भाजपच्या मतावर अन्य पक्षाचा फायदा होतो. त्यामुळे भाजपच्या पक्ष संघटनावर परिणाम होत आहे. आपल्या हक्काचा मतदारसंघ दुसऱ्यांना दिल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. मात्र, आता आपण लढायचच आणि हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेऊ देणार नाही, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्यावेळी चुकीचे सांगून आमचा मतदारसंघ घेतला. मात्र, यावेळी असे खपवून घेणार नाही. के. एस. चौगले, मारुती परितकर (मोरेवाडी), रंगराव व्हरांबळे (केर्ली), मधुकर दुधाणे (वरणगे), सरदार जाधव (वडणगे), दिलीप एकशिंगे (निगवे), अर्जुन पाटील (मुटकेश्वर), लक्ष्मण पाटील (पन्हाळा तालुकाध्यक्ष), शिवाजी पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), गामा पाटील (क।। ठाणे), बाजीराव लव्हटे (म्हाळुंगे), हैबती मगदूम (पुनाळ), रघुनाथ झेंडे (पडळ), आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आनंदराव पवळ यांनी स्वागत केले, तर सुरेश बेनाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)