शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फुलेवाडी लसीकरण केंद्रावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

फुलेवाडी : फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणात वशिल्याने लस दिल्याने व लवकर लस संपल्याने संतप्त नागरिकांनी ...

फुलेवाडी : फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणात वशिल्याने लस दिल्याने व लवकर लस संपल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी गोंधळ घातला. नंबर घेण्यासाठी बाहेर असणाऱ्या आशा वर्कर यांना नागरिकांना समजावणे अवघड झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. गुरुवारी केंद्रावर ३०९ लोकांनी नोंद केली, त्यापैकी १२२ जणांना लस देण्यात आली. उर्वरित नागरिकांची केंद्रावर भेटीसाठी आलेल्या उपायुक्त औंधकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करून परत पाठवले. लस संपल्याने वृद्ध नागरी व महिलांना ताटकळत बसण्याची वेळ आली.

लस घेण्यासाठी सकाळपासूनच महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लस कमी आहे असे समजतात काहींनी वशिल्याने आत घुसण्याचा प्रयत्न केला. परिणामी, नागरिकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यातच शिल्लक ६० डोस संपल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले, परतचे फक्त ५० डोस मिळाले. गुरुवाारी दिवसभरात १२२ जणांना लस देण्यात आली. फुलेवाडी लसीकरण केंद्रामध्ये आजअखेर ५७५० जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोट : आम्ही सकाळपासून नंबरमध्ये आहोत. येथील आत सोडणाऱ्या कर्मचाऱ्याने वशिल्याने काहींना आत सोडल्याने गोंधळ उडाला. आम्हाला उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागले. यंत्रणेमध्ये सुधार करण्याची गरज आहे.

-सोनाली हुक्किरेकर (लस घेण्यासाठी आलेली महिला)

आजपर्यंत सुरळीतपणे लसीकरण सुरू आहे. गुरुवारी लवकर लस संपल्याने नागरिकांनी गोंधळ केला. आशा वर्कर यांना नंबर लावण्याची जबाबदारी देऊनही काही नंबर खाली-वर झाले असण्याची शक्यता आहे.

-डॉ. सुनील नाळे, (केंद्रप्रमुख)

चौकट:

उद्याचे लसीकरण बंद

कोविशिल्डचे गुरुवारी आणलेले डोस संपल्याने आज, शुक्रवारी होणारे लसीकरण होणार नाही. डोस मिळाल्यानंतर लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. लसीकरण केंद्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ग्रामीणसह शहरातील लोक फुलेवाडी केंद्रावर लस घेण्यासाठी येत आहेत. त्यासाठी महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी नियंत्रणासाठी वाढवण्याची गरज आहे.

फोटो : २२ फुलेवाडी लसीकरण

ओळ : फुलेवाडी लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी.