शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेच्या पहिल्यादिवशी संमिश्र सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST

मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पहिल्या सत्रात मल्हार ग्रुप, ...

मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्यावतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पहिल्या सत्रात मल्हार ग्रुप, इचलकरंजी या संघाने ''''शिकवण'''' ही एकांकिका सादर केली. परंपरागत व्यवसाय स्वीकारायचा की शिक्षणाची वाट पकडून नवीन आयुष्य जगायचे, या प्रश्नाचा वेध या एकांकिकेने घेतला. जीवनज्योत नाट्यसंस्था, नवी मुंबई या संघाने ''''पूर्णविराम'''' या एकांकिकेत मानवी भावभावना आणि जन्म-मृत्यूशी झुंजत असलेल्या एका कलाकाराची कथा सांगितली आहे. अहिल्या थिएटर्स, मुंबई संघाने ''''कॉट नंबर २७'''' या एकांकिकेत कोविड साथीमुळे उद‌्भवलेली मेडिकल स्टाफची धांदल व त्याची जबाबदारी दाखवणारी होती. तसेच यामध्ये राजकारणही कसे झाले, याचे वास्तव मांडले.

दुसऱ्या सत्रात नटेश्वर कलाविष्कार, मुंबई संघाने ''''आरण्यक'''' ही एकांकिका सादर केली. एक मनोविकार तज्ज्ञ आणि पती-पत्नीची जोडी याच्या संबंधावरील गूढ आशयाची ही एकांकिका होती. त्यानंतर अहमदनगर या संघाने ''''दोरखंड'''' ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली. जगात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्ती आहेत; पण वाईट बळावली, तर चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनी एकजूट करून त्याचा प्रतिकार करायला हवा, असा संदेश या एकांकिकेने दिला.

पहिल्यादिवशी अखेरच्या सत्रात गडहिंग्लज कला अकादमी संघाने ''''बोले पोपट'''' ही एकांकिका सादर केली. अहमदनगरच्या पहिलं प्रॉडक्शन संघाने ''''शादी का माहोल'''' या एकांकिकेत लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्रित येणं असतं. यामध्ये विनाकारण मुलाची बाजू मोठी आणि मुलीची बाजू छोटी असा भेद असू नये, असा आशय मांडला आहे. शेवटची ''''पाझर'''' ही एकांकिका ब्लॅक बॉक्स थिएटर्स, इचलकरंजी संघाने सादर केली. नवीन पिढी आणि जुन्या पिढीमध्ये मतभेद असू शकतात; पण नवीन पिढीने जुन्या पिढीला समजून घेण्याची गरज असल्याचे या एकांकिकेमध्ये दाखविले आहे. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सुरू असलेल्या पहिल्यादिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

(फोटो ओळी)

२८१२२०२०-आयसीएच-०५

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पहिल्यादिवशी अहमदनगर या संघाने ''''दोरखंड'''' ही एकांकिका प्रभावीपणे सादर केली.