शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

नाईट लँडिंगसाठीच्या ‘ॲप्रोच लाईट‌्स’ची दोन महिन्यात पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट‌्स लावण्याचे काम दोन ...

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट‌्स लावण्याचे काम दोन महिन्यांत प्राधान्याने पूर्ण करणे. अतिरिक्त ६४ एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया विहित कालावधी निश्चित करून पूर्ण करण्याचा निर्णय बुधवारी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासमवेतच्या संयुक्त बैठक घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

दिल्लीतील विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला मी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळ येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी नाईट लँडिंग, धावपट्टी विस्तारीकरण, कार्गो हबची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर अडचणी आणि त्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १३७० मीटर लांबीची आहे. ही धावपट्टी २३०० मीटर पर्यंत वाढविण्यासाठी लागणारी ६४ एकर जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया विहीत कालावधी ठरवून पूर्ण करणे. त्यापूर्वी १९०० मीटरची धावपट्टी कार्यान्वित करण्यासाठी आणि नाईट लँडिंगसाठी लागणाऱ्या अँप्रोच लाईटसची उभारणी येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नाईट लँडिंग सुविधा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ होताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

चौकट

प्राधिकरणाची समिती कोल्हापूरला येणार

विमान उड्डाणमार्गात असणारे सर्व अडथळे काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी हालचाली गतिमान कराव्यात, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या अडथळ्यांच्या पाहणी व तपासणीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची तज्ञ समिती लवकरच कोल्हापूर विमानतळास भेट देणार आहे.

प्रतिक्रिया

कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी कामांची प्राथमिकता ठरवून सर्व कामे वेळेत पूर्ण करणे. विमानतळ अद्ययावत होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

-खासदार संभाजीराजे

फोटो (१७०२२०२१-कोल-विमानतळ बैठक ०१) : कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रश्नांबाबत दिल्ली येथे बुधवारी संयुक्त बैठक झाली. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल, खासदार संभाजीराजे, पालकमंत्री सतेज पाटील, विमानतळ प्रधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक उपस्थित होते.

फोटो (१७०२२०२१-कोल-विमानतळ बैठक ०२) : कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रश्नांबाबत दिल्ली येथे बुधवारी संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल, खासदार संभाजीराजे, पालकमंत्री सतेज पाटील, विमानतळ प्रधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांनी चर्चा केली.