शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

भरतीपूर्वी अतिरिक्त शिक्षक समायोजन पूर्ण करा; खाजगी शिक्षक महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:13 IST

कोल्हापूर विभागातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता द्यावी. पवित्र पोर्टल भरती सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले.

ठळक मुद्देभरतीपूर्वी अतिरिक्त शिक्षक समायोजन पूर्ण कराखाजगी शिक्षक महासंघाची मागणी; शिक्षण उपसंचालकांना निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता द्यावी. पवित्र पोर्टल भरती सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले.कोल्हापूर विभागातील सांगली, सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सन २०१८-१९ मधील संचमान्यता शाळांना देण्यात आल्या आहेत; पण कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये सन २०१८-१९ ची संचमान्यता अद्याप दिली नाही. कोल्हापूर विभागातील सर्वच जिल्ह्यांमधील प्राथमिक शाळांना त्वरित संचमान्यता द्यावी. ‘पवित्र पोर्टल’नुसार शिक्षकभरती सुरू होण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे.

ज्या संचमान्यतेमध्ये त्रुटी असतील अशा संचमान्यता दुरुस्तीबाबत योग्य शिफारशी करून त्या दुरुस्तीसाठी शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात याव्यात. कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम. डी. पाटील, शहराध्यक्ष दस्तगीर मुजावर, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, गौतम कांबळे, सुदर्शन सुतार, श्रीकांत पाटील, राजू निकम, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर