शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

झोरेंसह चौघांविरोधात तक्रार

By admin | Updated: August 19, 2014 23:42 IST

दगडफेक प्रकरण : सहायक पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजी : येथील नगरसेवक मदन झोरे यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित तिघांपैकी एकाने झोरे यांच्यासह चारजणांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रारदाराने चुकीची नावे दिली असून, याबाबत खात्री करूनच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत परिसरातील नागरिकांनी सहायक पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. अधिक माहिती अशी, काल, सोमवारी नगरसेवक झोरे यांच्या घरावर दगडफेक केल्याप्रकरणी झोरे यांनी येथील शिवाजीनगर पोलिसांत तिघांविरोधात तक्रार दिली आहे. दगडफेक करणाऱ्या तिघांना रोखून परिसरातील नागरिकांनी त्यांना मारहाण केली होती. यामध्ये जखमी झालेल्या दीपक दत्तात्रय सांगावकर (वय ३२, रा. साईनाथनगर) याने झोरे यांच्यासह विक्रम सुर्वे, महादेव हाळवणकर व अल्लाबक्ष बागवान (चौघे रा. शास्त्री सोसायटी) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे, असे म्हणत परिसरातील नागरिकांनी सहायक पोलीस अधीक्षक मकानदार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चातील प्रमुखांनी मकानदार यांच्याबरोबर चर्चा केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, परिसरात त्यांची दहशत आहे. अनेक महिला-पुरुषांना त्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करा. तसेच त्यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य नसून नोंद केलेल्या नावाच्या व्यक्ती त्यावेळी भाजपच्या सार्वजनिक कार्यक्रमात गेल्या होत्या. त्यामुळे त्याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावर मकानदार यांनी प्राथमिक नोंद घेतली असून, पोलीस तपास करूनच कारवाई करतील, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

बंद खोलीतील चर्चा मोर्चातील प्रमुखांनी मकानदार यांची केबिनमध्ये भेट घेतली. यावेळी फोटोग्राफर व पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. फोटोग्राफरना फोटो काढण्यास विरोध करून बातमी लावू नका, असे खुद्द मकानदारच सांगत होते. या प्रकरणात प्रसारमाध्यमांना रोखण्याचे कारण काय, असा प्रश्न यावेळी उपस्थितांना पडला होता.