शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे

By admin | Updated: September 6, 2015 23:28 IST

जिल्हा परिषदेचा निर्णय : शिक्षण विभागाचा पुढाकार, १२ लाखांचा निधी

दत्तात्रय पाटील - म्हाकवे  गावकामगार तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि ग्रामसेवकांपासून सी.ई.ओ.पर्यंत कोणतीही शासकीय नोकरी मिळविण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. मात्र, या स्पर्धांची तयारी करताना ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांची दमछाक होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून शिक्षण विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. प्रत्येक तालुक्याला एक केंद्र देण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येकी लाखाचा निधी देण्यात येणार आहे.या निधीतून यूपीएससी., एमपीएससी व इतर अन्य स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, संदर्भ ग्रंथ व आवश्यक फर्निचरही घेता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना या परीक्षेची तयारी करण्यासाठी बळकटी मिळणार आहे.या परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक संदर्भ साधने, पुस्तके, ग्रंथ यांच्या किमती जास्त आहेत. त्यामुळे सामान्य, गोरगरीब कुटुंबातील परीक्षार्थींना ही पुस्तके खरेदी करून परीक्षेला सामोरे जाणे आर्थिकदृष्ट्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. याचा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण समितीने विचार करून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात १२ मार्गदर्शन केंद्रांची निर्मिती करून त्यांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे १२ लाख रुपये जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून देण्यात येणार आहेत.शासनमान्य वाचनालये, शाळा, विद्यालये, महाविद्यालये यासारख्या घटकांमार्फत ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे चालविली जाणार आहेत. ज्या सार्वजनिक वाचनालये अथवा शाळांमध्ये या केंद्राला मंजुरी मिळेल, तेथे या उमेदवारांना अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. तसेच या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. तसे हमीपत्रच देणे बंधनकारक राहणार आहे.जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रयोगग्रामीण भागातील मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी. त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे जावे, या हेतूने जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे मार्गदर्शन केंद्रांच्या निर्मितीचा केलेला विचार उल्लेखनीय आहे. यासाठी स्वनिधीतून १२ लाखांचा निधीही उपलब्ध केला आहे. त्यामुळे असा पथदर्शी प्रयोग राबविणारी कोल्हापूर ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.