(वाणिज्य...) ‘नाना-नानी’ पार्क उद्यान नामफलकाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST2021-02-21T04:44:43+5:302021-02-21T04:44:43+5:30

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने नाना-नानी पार्क उद्यानाच्या नूतन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. क्रांतिकारक वासुदेव बळवंत ...

(Commerce ...) Unveiling of 'Nana-Nani' Park Park | (वाणिज्य...) ‘नाना-नानी’ पार्क उद्यान नामफलकाचे अनावरण

(वाणिज्य...) ‘नाना-नानी’ पार्क उद्यान नामफलकाचे अनावरण

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने नाना-नानी पार्क उद्यानाच्या नूतन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम झाला. रोटरीच्या वतीने गेली १९ वर्षे हे उद्यान उत्तमरीतीने सांभाळले जात आहे. रोटरीने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती नाना-नानी पार्क कमिटीचे चेअरमन उपेंद्र देऊसकर यांनी दिली. रोटरीचे प्रेसिडेंट अरविंद कृष्णन, सेक्रेटरी सिद्धार्थ पाटणकर, रोटरी समाज सेवा केंद्राचे प्रेसिडेंट व्ही. एन. देशपांडे, सेक्रेटरी सुभाष मालू, डॉ. राजाराम घाटगे आदी उपस्थित होते. संजीव चिपळूणकर, शिल्पा दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो ओळी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने नाना-नानी पार्क उद्यानाच्या नूतन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपेंद्र देऊसकर, अरविंद कृष्णन आदी उपस्थित होते. (फोटो-२००२२०२१-कोल-रोटरी)

Web Title: (Commerce ...) Unveiling of 'Nana-Nani' Park Park