वाणिज्य वृत्त : ब्रम्हास्त्र ग्रुपतर्फे निशिगंधा वाड यांच्याशी दिलखुलास गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:44+5:302021-02-20T05:11:44+5:30

कोल्हापूर : ‘शस्त्र नव्हे, मैत्रीतून प्रगतीचे शास्त्र’ हे ब्रीद घेऊन ब्राम्हण उद्योजक व नव उद्यमी महिलांनी एकत्र येऊन तीन ...

Commerce News: Heartfelt chat with Nishigandha Wad on behalf of Bramhastra Group | वाणिज्य वृत्त : ब्रम्हास्त्र ग्रुपतर्फे निशिगंधा वाड यांच्याशी दिलखुलास गप्पा

वाणिज्य वृत्त : ब्रम्हास्त्र ग्रुपतर्फे निशिगंधा वाड यांच्याशी दिलखुलास गप्पा

कोल्हापूर : ‘शस्त्र नव्हे, मैत्रीतून प्रगतीचे शास्त्र’ हे ब्रीद घेऊन ब्राम्हण उद्योजक व नव उद्यमी महिलांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ब्रम्हास्त्र ग्रुपच्यावतीने कोल्हापुरात अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. याेगिता गुळवणी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत डॉ. वाड यांनी दिलखुलास गप्पा मारताना महिलांच्या शंकांचे निरसन करून सामाजिक बांधिलकी जपणारा महिला उद्योजक वर्ग तयार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

शीतल धर्माधिकारी यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पल्लवी देशपांडे यांनी ओळख करून दिली, तर मुग्धा केसरकर यांच्याहस्ते वाड यांचा सत्कार झाला. स्वाती गोखले यांनी मतिमंद मुलांसाठीच्या कामाचे अनुभव सांगितले. या कार्याला ललिता नाखे यांच्याहस्ते सत्कारही झाला. आरती रास्ते यांनी आभार मानले. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो: १९०२२०२१-कोल-ब्रम्हास्त्र

फोटो ओळ : कोल्हापुरात ब्रम्हास्त्र ग्रुपतर्फे अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी नव उद्योजक महिलांना मार्गदर्शन केले.

Web Title: Commerce News: Heartfelt chat with Nishigandha Wad on behalf of Bramhastra Group