वाणिज्य बातमी : भंडारी ग्रुपचे ई-काॅमर्स क्षेत्रात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST2021-01-15T04:20:56+5:302021-01-15T04:20:56+5:30

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील भंडारी ट्रेडर्सच्यावतीने ड्रायफ्रूट्स‌् व मसाल्यांची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करता यावी. याकरिता भंडारी ग्रुपचे ई-काॅमर्स सकेतस्थळ सुरू ...

Commerce News: Bhandari Group debuts in e-commerce | वाणिज्य बातमी : भंडारी ग्रुपचे ई-काॅमर्स क्षेत्रात पदार्पण

वाणिज्य बातमी : भंडारी ग्रुपचे ई-काॅमर्स क्षेत्रात पदार्पण

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील भंडारी ट्रेडर्सच्यावतीने ड्रायफ्रूट्स‌् व मसाल्यांची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करता यावी. याकरिता भंडारी ग्रुपचे ई-काॅमर्स सकेतस्थळ सुरू केले आहे. त्याचे अनावरण खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जयसिंगराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या, शनिवारी (दि. १६) हाॅटेल पॅव्हेलियन येथे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक अक्षय नाईक यांनी दिली.

लक्ष्मीपुरीतील व्यावसायिक क्षेत्रात गेली पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या भंडारी ट्रेडर्स यशस्वी वाटचाल करीत आहे. या यशानंतर ट्रेडर्सचे संस्थापक नामदेव भगवान भंडारी, वियज नामदेव भंडारी, विशाल नामदेव भंडारी यांनी ड्रायफ्रूटस‌् व मसाले या नावाने नवीन फर्म सुरू केली आहे. त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. भंडारी ग्रुपचे ड्रायफ्रूटस‌् व मसाले ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता यावेत याकरिता ई-काॅमर्स संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून ग्राहकांना थेट घरपोच या वस्तू मिळणार आहेत.

Web Title: Commerce News: Bhandari Group debuts in e-commerce