वाठारामध्ये विकासकामांचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST2021-03-24T04:21:32+5:302021-03-24T04:21:32+5:30

नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले ) येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या विकास निधीतील विविध विकासकामांचा प्रारंभ सरपंच तेजस्विनी वठारकर ...

Commencement of development work in Wathara | वाठारामध्ये विकासकामांचा प्रारंभ

वाठारामध्ये विकासकामांचा प्रारंभ

नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले ) येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या विकास निधीतील विविध विकासकामांचा प्रारंभ सरपंच तेजस्विनी वठारकर यांच्या हस्ते झाला. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे अध्यक्षस्थानी होते. भारतमाता कॉलनीमधील गटर बांधणी, महादेव मंदिरनजीकच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ नूतन सरपंच तेजस्विनी वठारकर यांच्या हस्ते झाला. निवळे वसाहतीत जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्या फंडातून विठ्ठलाई मंदिराचा पायाभरणी अशोकराव माने यांच्या हस्ते झाला.

यावेळी उपसरपंच राहुल पोवार, सदस्य महेश कुंभार, रेश्मा शिंदे, गजेंद्र माळी, सुहास पाटील, सागर कांबळे, महेश शिर्के, सचिन कुंभार, सुजाता मगदूम, सुशीला चौगुले, अश्विनी कुंभार, रुक्साना नदाफ, नाजुका भुजिंगे, सुरेखा मस्के आदी पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी २३ वाठार अशोकराव माने

: वाठार (ता. हातकणंगले ) येथील निवळे वसाहत येथे जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्या हस्ते विठ्ठलाई मंदिराचा पायाभरणी शुभारंभ झाला.

Web Title: Commencement of development work in Wathara