शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तासगावमध्ये कोम्बिंग आॅपरेशन

By admin | Updated: June 3, 2015 01:01 IST

दरोडेखोरांचा शोध : दीडशे पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर

तासगाव : तासगावच्या पोलीस कोठडीतून रविवारी रात्री तीन अट्टल दरोडेखोर फरारी झाले. त्यांच्या शोधासाठी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सात पथके कार्यरत आहेत. ८० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शोधासाठी कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.रविवारी मध्यरात्री तासगावच्या पोलीस कोठडीतून तीन अट्टल दरोडेखोर फरारी झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी सात विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहेत. या दरोडेखोरांच्या गावाकडेही पथक पाठविण्यात आले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरोडेखोरांच्या अंगावर पूर्ण कपडे नाहीत. तसेच त्यांच्याकडे पैसेही नाहीत. याचा अंदाज घेऊन पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू आहे. विशेष पथकासह ८० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशनच्या माध्यमातून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी विश्वनाथ घनवट यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. विट्याचे पोलीस उपअधीक्षक अभिजित पाटील हे पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. लवकरच दरोडेखोरांना पकडण्यात यश येईल, असेही लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. तासगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनिमित्त पार्टी केली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. केवळ स्रेहमेळावा आणि भोजनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम रात्री दहा वाजता संपला होता. त्यानंतर सर्व अधिकारी आपापल्या कामावर हजर होते. स्रेहमेळाव्याचा कार्यक्रम एका कार्यालयात होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार, मदतनीस आणि पोलीस कोठडीतील सुरक्षा कर्मचारी कामावरच असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)पोलीस पोहोचण्यापूर्वी संशयितांचे पलायनसोमवारी सायंकाळी तीन तरुण शिरगाव (विसापूर) परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. त्यांची विचारपूस केल्यानंतर शिकारीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्याकडे शिकारीसाठीचे साहित्यही नव्हते आणि त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडेही नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांना संशय आला. ही माहिती तासगाव पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांची पथके तात्काळ शिरगावमध्ये हजर झाली. पोलीसपथक आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून शिरगाव आणि विसापूर परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र दरोडेखोरांना शोधण्यात यश आले नाही.