शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

संगीत-चित्रशिल्पकृतींनी रंगली मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शास्त्रीय संगीताचा स्वर, तान आलापांनी घेतलेला मनाचा ठाव आणि निसर्गचित्र, अमूर्त निसर्गचित्र, शिल्पांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शास्त्रीय संगीताचा स्वर, तान आलापांनी घेतलेला मनाचा ठाव आणि निसर्गचित्र, अमूर्त निसर्गचित्र, शिल्पांच्या माध्यमातून कलेचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करत रविवारी रंगसुरांची मैफल रंगली.

दरवर्षी टाऊन हाॅलच्या बागेत रंगणारी हा मैफल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र ऑनलाईन सादर करण्यात आली. यावेळी कलाशिक्षिका डॉ. नलिनी भागवत यांना ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्याहस्ते रंगबहार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर, विश्‍वरंग विश्‍वनाथ नागेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी जानेवारी महिन्यातील रविवारी ही मैफल आयोजित केली जाते. दरवर्षी टाऊन हॉलच्या निसर्गरम्य बागेत मान्यवरांच्या व रसिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव, इंद्रजित नागेशकर, कार्यवाह संजीव संकपाळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, कलाकारांनी आपल्याभोवती, समाजात घडत असलेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास करून त्याचे प्रतिबिंब कलेच्या माध्यमातून उमटवले पाहिजे. कला ही जशी मनोरंजनाची बाब आहे, तशीच ती सामाजिक स्थित्यंतरांचीही साक्षीदार असल्याने कलाकाराने कलाकृतीतून व्यक्त झाले पाहिजे.

डॉ. नलिनी भागवत यांनी त्यांचा कलाप्रवास उलगडला. यानंतर गायक मधुसूदन शिखरे यांनी सूर आळवत मैफलीला सुरुवात केली. त्यांनी ‘मिया की तोडी’ या प्रभातकालीन रागातील तीन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ‘भीमपलास’ रागातील तीन रचना सादर केल्या. त्यांना निखिलेश शिखरे (तबला), मयुरेश शिखरे (हार्मोनियम), निनाद खाडिलकर (तानपुरा) यांची साथ होती.

दुसरीकडे चित्रकार-शिल्पकार कलाकृती साकारू लागले. ज्येष्ठ चित्रकार व माजी प्राचार्य जी. एस. माजगावकर यांनी रंगरेषांच्या माध्यमातून कॅनव्हासवर निसर्गचित्र, तर चित्रकर्ती माजी प्राचार्या अस्मिता जगताप यांनी अमूर्त शैलीतील निसर्गचित्र साकारले. शिल्पकार संजीव संकपाळ यांनी रा. शि. गोसावी कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांचे शिल्प साकारले.

कार्यक्रमाला सुहासिनी जाधव, प्राचार्य अजेय दळवी, रियाज शेख, विलास बकरे, विजय टिपुगडे, अमृत पाटील, किशोर पुरेकर, उज्ज्वल दिवाण, पार्श्‍वनाथ नांद्रे, प्रशांत जाधव, एस. निंबाळकर, अतुल डाके, सुरेश मिरजकर, मनोज दरेकर, मानसिंग टाकळे उपस्थित होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी स्वागत केले.

--

फोटो नं १७०१२०२१-कोल-रंगबहार०१

ओळ : कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात रविवारी रंगबहार संस्थेच्यावतीने आयोजित मैफल रंगसुरांची या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकर्ती नलिनी भागवत यांना डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अमृत पाटील, विजय टिपुगडे, धनंजय जाधव, इंद्रजित नागेशकर, व्ही. बी. पाटील, संजीव संकपाळ, प्राचार्य अजेय दळवी आदी उपस्थित होते.

--

०२

यावेळी अस्मिती जगताप यांनी अमूर्त शैलीतील चित्र साकारले.

--

०३

ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांनी निसर्गचित्र साकारले.

--

०४

गायक मधुसूदन शिखरे यांचे शास्त्रीय गायन झाले.

--

०५

शिल्पकार संजीव संकपाळ यांनी ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत जोशी यांचे शिल्प साकारले.

--