शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सहकारातील कामकाज गतिमान

By admin | Updated: September 6, 2015 23:24 IST

चंद्रकांतदादा पाटील : पोस्टल कर्मचारी पतसंस्थेचा कार्यक्रम

कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटे तीनपर्यंत बसून फायलींचा निपटारा करीत असतात. माझ्या खात्याचा कारभारही असाच सुरू आहे. त्यामुळे सहकारातील कामकाजही गतिमान केले आहे, असे प्रतिपादन सहकार व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. जिल्हा पोस्टल कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी आयोजित शैक्षणिक बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. डाक विभागाचे प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. मंत्री पाटील म्हणाले, प्रत्येक घटकाने आपल्या समूहाची काळजी घेतल्यास समाजाचा विकास लवकर होईल. पोस्टल कर्मचारी यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेची कामगिरी चांगली आहे. अन्य संस्था अडचणीत असताना उत्कृष्ट कामगिरीमुळे पोस्टल कर्मचाऱ्यांची पतसंस्था १४ टक्के लाभांश देते, हे कौतुकास्पद आहे. पोस्टल कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांसाठी स्वतंत्र अकॅडमी सुरू करावी. त्याला पूर्णपणे सहकार्य राहील. अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यावेळी सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. अधीक्षक पाटील यांनी पतसंस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला. सुरेश मगदूम यांनी स्वागत केले. भाग्यश्री चरणकर यांनी सूत्रसंचालन केले. हास्यसम्राट प्रा. राहुल कुलकर्णी यांचा ‘हसवेगिरी’ हा एकपात्री प्रयोग सादर झाला. उपाध्यक्ष आर. ए. संकपाळ, एन. जे. हंजे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. ‘इनकॅश’ करावे लागते...चंद्रकांतदादा यांनी, ‘भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे ‘पोस्टल’च्या कार्यक्रमाला उशीर झाला. पालिका निवडणूक तोंडावर असल्यामुळे सगळ्यांना ‘इनकॅश’ करावे लागत आहे,’ असे सांगताच हशा पिकला. एकेरी उल्लेख, दिलगिरीभाषणात बोलण्याच्या ओघात मंत्री चंद्रकांतदादा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख एकेरी केला. मात्र, ते लक्षात आल्यानंतर त्वरित दिलगिरीही व्यक्त केली.