शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

सहकारात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: December 2, 2014 23:50 IST

...तर संस्था अवसायनात : औद्योगिक, पणन, हौसिंग संस्थांचा भरणा

राजाराम लोंढे :कोल्हापूर :शासकीय लाभ व मतदानासाठी संस्था काढणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. गावपातळीवरील दूध संस्थेपासून तालुका पातळीवर काम करणाऱ्या औद्योगिक-पणन संस्थांचा यामध्ये समावेश आहे. राखीव गटातील संस्थांना राज्य व केंद्र सरकारकडून विविध मार्गांनी अनुदान मिळते. संस्थेची नोंदणी करायची आणि अनुदान लाटायचे या भूमिकेतून गेले दहा-पंधरा वर्षांत शेकडो संस्था अस्तित्वात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय लाभासाठी औद्योगिक, पणन व हौसिंग सोसायट्यांचा समावेश आहे.जिल्हा बँक, जिल्हा दूध संघासह इतर जिल्हा व तालुका स्तरीय संस्थांच्या निवडणुकीत थेट संस्थांच्या प्रतिनिधीला मतदानाचा हक्क असतो. जास्तीत जास्त ठरावधारक आपल्या ताब्यात असाव्यात, यासाठी राजकीय मंडळींनी पिशवीतील संस्था स्थापनेचा सपाटाच लावला होता. त्यामुळेच ग्रामीण भागात दूध, विकास व पाणीपुरवठा संस्थांचे पेव फुटले. एकाच गावात दोन-तीन संस्था झाल्या तरी कामकाज कागदावरच सुरू आहे. मध्यंतरी अशा संस्थांवर कारवाई केली होती, पण म्हणावी तशी सफाई झालेली नाही.सध्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. वर्गवारीनुसार संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण केला जाणार असून त्यानंतर गेल्या पाच वर्षांत सहकार विभागाच्या प्रत्येक गोष्टीत प्रतिसाद न देणाऱ्या संस्थांवरकारवाई केली जाणार आहे. त्यातील चालू असणाऱ्या संस्थांवर प्रशासक तर बंद असणाऱ्या संस्थांवर अवसायकांची नेमणूक केली जाणार आहे. जिल्ह्णात सुमारे दोनशे संस्था असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. लाखोंच्या अनुदानासाठी नुसतीच नोंदणीऔद्योगिक व पणन संस्थांसाठी शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान मिळते. हे अनुदान हडप करण्यासाठीच केवळ संस्थेची नोंदणी करण्याचा उठाठेव केली जाते. यामध्ये औद्योगिक व पणन संस्थांचा भरणा अधिक आहे. ज्या सहकारी संस्था निबंधक कार्यालयाला प्रतिसाद देत नाहीत, अशा संस्थांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. बहुतांश संस्थांच्या निवडणुकींच्या कार्यक्रमामुळे अशा संस्था प्रकर्षाने पुढे येत आहेत, त्या अवसायनात काढण्यात येतील.- सुनील शिरापूरकर(जिल्हा उपनिबंधक) ठरावासाठीच शिक्का बाहेरनिवडणुकीसाठी काढलेल्या संस्थांचे कामकाज नियमित नसते. जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघासह इतर संस्थांच्या निवडणुका आल्या की संस्थेच्या नावाचे लेटरपॅड व शिक्का बाहेर काढला जातो.