शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

निर्मळ मनाचा स्पष्ट वक्ता--सदाशिवराव मंडलिक

By admin | Updated: March 11, 2015 00:33 IST

स्वच्छ पारदर्शी नेतृत्व

सदाशिवराव मंडलिक यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांना वाचनाची सवय, अभ्यासाची बैठक होतीे. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची मागणी करताना त्यांनी देशातील कृषी क्षेत्राचे बजेट किती आणि ते किती वाढवायला हवे याची माहिती आकडेवारीसह दिली होती. घोषणा करून न थांबता त्यासंबंधी संबंधित मंत्री, अधिकारी किंवा खाते यांच्याकडेही पाठपुरावा करण्याची त्यांना सवय होतीे. त्यांच्या रोखठोक स्वभावाने त्यांच्याबद्दल नेतृत्वाच्या मनात अनेकदा गैरसमज निर्माण झाले. २००४मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी आपल्याला भाजपसह सर्व पर्याय खुले असल्याचे विधान केले, तेव्हा त्यास उघडपणे विरोध करणारे एकटे मंडलिकच होते. या विरोधामुळे त्यांच्या प्रतिमेला वेगळी उंची मिळाली. मंडलिक यांची कारकीर्द ऐन भरात असताना पत्नीचा आधार नियतीने हिरावून घेतला. हे दु:ख मोठे परंतु मंडलिक त्यातूनही उभे राहिले होते. कोल्हापूर जिल्हा देशाच्या नकाशावर समृद्ध जिल्हा झाला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. काळम्मावाडी योजना पूर्ण करून सिंचनाबरोबर कोल्हापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात ते यशस्वी झाले. पाटगाव व चिकोत्रा प्रकल्प पूर्ण करून महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील जनतेलाही सिंचन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवले.स्वच्छ पारदर्शी नेतृत्वसंघर्षाशिवाय सुतळीचा तोडाही मिळाला नाही, असे जाहीरपणे सांगणाऱ्या एका ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मुलाने दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती, उच्च नीतीमूल्यांची जोपासना करताना पराकोटीचा संघर्ष पचवत, विधानसभा आणि लोकसभेच्या सलग ४७ वर्षे अकरा निवडणुका लढवून ३५ वर्षे लोकप्रतिनिधी राहण्याचा विक्रम करत, खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी जनमानसावर आपल्या स्वच्छ व पारदर्शी कार्याचा ठसा उमटवला. वयाच्या पंचाहत्तरीतही विकासकामांच्या मजबूत धाग्यांनी जिल्ह्याच्या समाजकारणात व राजकारणात पन्नास वर्षे अवितरपणे कार्यमग्न असणारे हे बावनकशी नेतृत्व... राजकारणात सत्ता मिळविणे सोपे असते, मात्र ती टिकविणे खूप अवघड असते. सत्तेची नशा चढलेल्या भल्याभल्यांना जनतेने भुईसपाट केल्याची शेकडो उदाहरणे आहेत. खासदार मंडलिक यांनी ४७ वर्षे सत्तेचा सोपान बळकट केला. कार्यकर्त्यांना गृहीत धरून वाटचाल करताना घरादारांचा केलेला त्याग मंडलिकांच्या मोठेपणाचे बलस्थान होते. जय-पराजयापेक्षा लढत राहा, या त्यांच्या शिकवणीने कार्यकर्त्यांना जिल्हाभर मानाची पदे मिळाली. लोकसभेत गेल्यानंतर विधानसभेचा आपला उत्तराधिकारी ठरविताना त्यांनी स्वत:च्या मुलापेक्षा कार्यकर्त्याला संधी दिली. त्यातूनच हसन मुश्रीफ कागलचे आमदार झाले. गुरू-शिष्यांची ही जोडी राजकीयदृष्ट्या यशस्वी होत असतानाच तिला नजर लागली. गुरू-शिष्यांचा संघर्ष अखेरपर्यंत राहिला.