शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मानवी साखळीद्वारे स्वच्छता मोहीम

By admin | Updated: December 14, 2015 00:07 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम : १४० किलोमीटरचा रस्ता झाला चकचकीत

कोल्हापूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण राज्यभरात गेल्या वर्षापासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रतिष्ठानतर्फे शहरात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शहरातील मुख्य चौक, रस्त्यांसह गल्लीचा परिसर ‘चकाचक’ झाला. यावेळी स्वच्छता अभियानात कुठेही ‘चमकोगिरी’ करताना कोणी दिसत नव्हते. सर्वसामान्य व्यक्तीपासून डॉक्टर, इंजिनिअर, वकील, नोकरदार अशा १ हजार ९३७ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे १४० किलोमीटरचा रस्ता साफ केला. पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या दृष्टिकोनातून देशभर स्वच्छता मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. विद्यासागर यांनी ‘स्वच्छता दूत’ म्हणून नियुक्त केले आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राज्यभर राबविण्यात आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी शहरात विविध ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून या अभियानास प्रारंभ झाला. मानवी साखळीच्या पद्धतीने ठरावीक १४० किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले. यामध्ये १ हजार ९३७ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत महापौर अश्विनी रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, नगरसेवक राहुल माने, विजयसिंह खाडे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांसह गारगोटी, इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, माणकापूर, मौजे सांगाव, कागल, साळवण, कळे, बालिंगे, वाघवे, मलकापूर, बांबवडे, बच्चे सावर्डे, कोडोली, बहिरेवाडी, अंबप, प्रयाग चिखली, वडणगे, भुयेवाडी येथील स्वयंसेवक सहभागी झाले होते. +++रस्ते, चौक चकाचक शहरात राबविण्यात आलेल्या अभियानात प्रमुख रस्ते, चौक तसेच व्यापारी संकुल परिसरात स्वच्छता करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील विविध चौकांपासून सुरुवात झाली. प्रतिष्ठानच्या या मोहिमेत शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील संपूर्ण कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. शहरात १४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या दुतर्फा सफाई करण्यात आली. यामुळे अभियानानंतर संपूर्ण परिसर चकाचक झालेला दिसून आला. येथे झाली स्वच्छताशालिनी पॅलेस - महानगरपालिका - कावळा नाका, क्रशर चौक ते संभाजीनगर, संभाजीनगर ते सायबर चौक, कळंबा ते सीपीआर हॉस्पिटल, सीपीआर ते शुगर मिल, रेणुका मंदिर ते दसरा चौक, रेल्वे उड्डाणपूल ते बिंदू चौक, कसबा बावडा भगवा चौक ते मध्यवर्ती बसस्थानक, डीएसपी आॅफिस ते कावळा नाका, माउली पुतळा ते परीख पूल, पापाची तिकीट ते नाथा गोळे तालीम, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील सर्व गल्ल्या, रंकाळा तलावाचा संपूर्ण परिसर यासह यामध्ये येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. ४टाउन हॉल, हुतात्मा पार्क, सिद्धाळा गार्डन, पद्माराजे गार्डन येथेही सकाळी सात ते सव्वाअकरापर्यंत ही मोहीम सुरू होती. विविध गट सहभागी : ८१ टन कचरा उचलला, ट्रॅक्टर, डंपरचा वापरडॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेमधून महापालिकेकडून सुमारे ८१ टन कचरा उचलण्यात आला. यावेळी विविध गट तयार करण्यात आले होते. या प्रत्येक गटाला दहा किलोमीटर अंतराची सफाई करावयाची होती. यामुळे शहरातील विविध भागांत झालेल्या मोहिमेसाठी प्रतिष्ठानचे १ हजार ९३७ अधिक स्वयंसेवक सहभागी होते. मोहिमेंतर्गत सुमारे ८१ टन कचरा उचलण्याचे काम करण्यात आले. यासाठी नऊ ट्रॅक्टर, एक डंपर व १६ घंटागाड्यांचा वापर करण्यात आला.