Kolhapur Crime: मुलींची छेड काढणाऱ्यांना नागरिकांनी दिला चोप; एक ताब्यात, दोघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 13:11 IST2023-08-01T13:09:52+5:302023-08-01T13:11:43+5:30

एका रोडरोमिओला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

Citizens gave chop to those who molest girls; One in custody, Incidents in Kolhapur | Kolhapur Crime: मुलींची छेड काढणाऱ्यांना नागरिकांनी दिला चोप; एक ताब्यात, दोघे पसार

Kolhapur Crime: मुलींची छेड काढणाऱ्यांना नागरिकांनी दिला चोप; एक ताब्यात, दोघे पसार

कोल्हापूर : शाहू मैदान बसस्टॉप येथे शालेय मुलींची छेड काढणाऱ्या तीन रोडरोमिओंना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. संतप्त नागरिकांचा रुद्रावतार पाहून दोन तरुणांनी पळ काढला. एका रोडरोमिओला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हा प्रकार सोमवारी (दि. ३१) दुपारी चारच्या सुमारास घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शाहू मैदान बसस्टॉप येथे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास काही शालेय मुली बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी काही तरुण मुलींची छेड काढत होते. त्याचवेळी तिथून जाणारे विवेक वोरा यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी विचारणा केली असता, रोडरोमिओंनी वोरा यांना शिवीगाळ केली. शालेय मुलींनी तक्रार करताच वोरा यांनी रोडरोमिओंची धुलाई सुरू केली.

काही नागरिक मदतीला धावल्याने त्यांनी तिघांना पकडून बेदम मार दिला. शालेय मुलींनीही यावेळी रोडरोमिओंना चपलांनी धुतले. संतप्त नागरिकांनी रोडरोमिओंना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती केली.

श्रेयांश माळी, रोहित क्षीरसागर आणि अमोल कांबळे अशी संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 

Web Title: Citizens gave chop to those who molest girls; One in custody, Incidents in Kolhapur