चौगुले दाम्पत्यांकडून शिवराज्याभिषेकाची २ हजार चित्रे वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:56+5:302021-06-05T04:18:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील डॉ. सोपान चौगुले यांनी त्यांच्या पत्नी डॉ. अल्पना यांनी काढलेल्या शिवराज्याभिषेकाच्या चित्राच्या दोन ...

Chougule couple distributes 2,000 pictures of Shiva's coronation | चौगुले दाम्पत्यांकडून शिवराज्याभिषेकाची २ हजार चित्रे वितरित

चौगुले दाम्पत्यांकडून शिवराज्याभिषेकाची २ हजार चित्रे वितरित

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील डॉ. सोपान चौगुले यांनी त्यांच्या पत्नी डॉ. अल्पना यांनी काढलेल्या शिवराज्याभिषेकाच्या चित्राच्या दोन हजार प्रती जिल्ह्यात वितरित केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने रविवारी शिवराज्याभिषेक दिन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमध्ये साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने एक हजार चित्रे ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आली आहेत.

डॉ. अल्पना चौगुले या मूळच्या साताऱ्याच्या असून, तेथील नगरपालिकेच्या मागच्या बाजूस त्यांचे माहेर आहे. विवाहानंतर त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या असून, त्यांना सुरुवातीपासून पेंटिंग काढण्याची आवड आहे. शाहुपुरी पाचव्या गल्लीतील त्यांच्या रुग्णालयामध्ये त्या गेली २२ वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत.

त्यांनी काही वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेकाचे चित्र काढले होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांनी या चित्राचे कौतुक केले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवराज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्यदिन म्हणून जाहीर केल्याने हे चित्र मुश्रीफ यांनाही दाखवण्यात आले. त्यांनीही या चित्राची प्रशंसा केल्यानंतर सर्व ग्रामपंचायतींना हे चित्र वितरित करण्यात आले आहे.

०४०६२०२१ कोल शिवराज्याभिषेक

Web Title: Chougule couple distributes 2,000 pictures of Shiva's coronation