शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लोरीन’ने भाजीपाला करपला

By admin | Updated: July 31, 2015 00:38 IST

शेतकऱ्यांना फटका : सिलिंडर नष्टसाठी धडपड; ‘विश्वा’ला नोटीस

कोल्हापूर/कसबा बावडा : कसबा बावडा येथील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) बुधवारी झालेल्या क्लोरीन वायूच्या गळतीचा परिणाम ‘एसटीपी’ प्रकल्पाच्या परिसरातील पिकांवरही दिसू लागला आहे. गुरुवारी भेंडी, वांगी, मुळा, घेवडा यांचा भाजीपाला प्लॉट करपू लागल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. अनिरुद्ध रामराव पाटील (रा. पाटील गल्ली, कसबा बावडा) यांची शेती प्लॉटच्या समोरच आहे. शेतात त्यांनी एक महिन्यापूर्वी भेंडी, मुळा, वांगी, घेवडा, आदी भाज्यांच्या रोपांची लावण केली होती. मंगळवारपर्यंत या पिकांवर कोणताही रोग अथवा किडीचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र, वायू गळतीनंतर गुरुवारी सकाळी भाजीपाल्यांवर परिणाम झाल्याचे पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आले. या प्लॉटच्या शेजारी असणाऱ्या उसावर तसेच रस्त्याकडेच्या झुडपांवरही या वायू गळतीचा परिणाम झाल्याचे दिसत होते. तसेच गुरुवारी दिवसभर या परिसरात उग्र वास जाणवत होता. दरम्यान, औद्योगिक सुरक्षा विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली, तर महापालिकेने एसटीपी चालविण्याचा ठेका असलेल्या ‘विश्वा इन्फ्रा’ला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावत अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये, याबाबात योग्य ती व्यवस्था करण्याचे आदेश दिले. ‘एसटीपी’ केंद्रात बुधवारी झालेल्या गळतीमुळे येथील सहा कर्मचारी गुदमरले. पाचजणांवर प्राथमिक उपचार करून बुधवारीच रुग्णालयातून सोडण्यात आले होते, तर फुलेवाडीतील अक्षय मगदूम यास गुरुवारी सकाळी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. महापालिकेच्या जलविभागाने क्लोरीनची ती गळकी टाकी रिकाम्या जागेत नेली. पाण्यात ठेवून त्यावर सोडीयम हायड्रॉक्साईड व कॉस्टिक सोडा टाकण्यात आला. येत्या दोन दिवसांत या गळक्या टाकीतील क्लोरीनचे विभाजन होईल, असे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी सांगितले. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी व निरीक्षण करून हवेतील क्लोरीनच्या प्रमाणाची तपासणी करून अधिक माहितीसाठी हवेतील घटक प्रयोगशाळेत पाठविले.