Kolhapur: पतंग उडविताना लाकडाचा ओंडका डोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू, संक्रातीच्या सणादिवशीच घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:00 IST2026-01-14T13:58:41+5:302026-01-14T14:00:35+5:30
लाकडाच्या ओंडक्यावर उभा राहून पतंग उडवीत होता

Kolhapur: पतंग उडविताना लाकडाचा ओंडका डोक्यात पडल्याने बालकाचा मृत्यू, संक्रातीच्या सणादिवशीच घडली दुर्दैवी घटना
आजरा : पतंग उडवीत असताना लाकडाचा ओंडका डोक्यावर पडल्याने बालकाचा मृत्यू झाला. आदेश संजय पोवार (वय १० रा. मुरुड जि. लातूर, सध्या रा. राईस मिलजवळ आजरा) असे मृत बालकाचे नाव आहे. संक्रातीच्या सणादिवशीच ही घटना घडल्यामुळे आजऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पोवार कुटुंबीय लातूरवरून खुरपी तयार करण्यासाठी आजऱ्यात १५ दिवसांपूर्वी आले आहेत. सकाळी आदेशचे आई, वडील, आजोबा व मामा खुरपी तयार करीत होते. तर आदेश व बहीण आदितीसोबत लाकडाच्या ओंडक्यावर उभा राहून पतंग उडवीत होता. अचानक लाकडाच्या ओंडक्यावरून पाय निसटल्याने तो खाली पडला. व डोक्यावर ओंडका पडल्याने रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.