शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

टाउन हॉल बागेतून बालकाचे अपहरण

By admin | Updated: February 19, 2015 00:30 IST

कोल्हापुरातील घटना : शोध घेऊनही सापडला नाही, पोलीस हतबल

कोल्हापूर : टाउन हॉल बागेत खेळत असलेल्या दोन वर्षांच्या बालकाचे अज्ञातांनी सोमवारी (दि. १६) दुपारी अपहरण केल्याचा प्रकार घडला. फरान ऊर्फ आयान अकिब जांभारकर (रा. सिद्धार्थनगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी व नातेवाइकांनी त्याचा शोध घेऊनही तो अद्याप सापडलेला नाही. त्याचे अपहरण नेमके कोणी केले असावे, याबाबत पोलीस अत्यंत बारकाईने माहिती घेत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, अकिब मन्सूर जांभारकर हे केळी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची टाउन हॉल बागेजवळ केळीची हातगाडी आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मुलगा फरान हा टाउन हॉल बागेत इतर मुलांसोबत खेळत होता. दुपारी तीननंतर तो अचानक गायब असल्याचे दिसले. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी त्याचा बागेत शोध घेतला असता तो आढळला नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. वडिलांनी तो घरी गेला आहे का, त्याची चौकशी केली. तिथेही तो नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला चौकशी केली असता तो आढळला नाही. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १७) फिर्याद दिली. पोलिसांनी वायरलेसवरून जिल्ह्णातील सर्व पोलिसांना सूचना केल्या. फरान याची उंची दोन फूट, अंगाने जाड, रंगाने काळा-सावळा, गळ्यात काळ्या रंगाचा तावीज, अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट, थ्री फोर्थ पॅँट, उजव्या डोळ्याच्या भुवईवर आॅपरेशनचे जुने टाक्याचे व्रण असून तो तोतरा बोलतो. पोलिसांनी टाउन हॉल परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेजही पाहिले असून, त्यामध्येही तो दिसून आलेला नाही. (प्रतिनिधी)