मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:26 IST2026-02-04T12:25:49+5:302026-02-04T12:26:28+5:30

कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीला दूरदृष्टप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Chief Minister inquires about IT Park, Shaktipeeth land acquisition in Kolhapur | मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती

मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील आयटी पार्क, शक्तिपीठ भूसंपादनाची माहिती

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. यात कोल्हापुरातील आयटी पार्कचा प्रस्ताव आणि शक्तिपीठ महामार्गाचा समावेश आहे. कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीला दूरदृष्टप्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोल्हापुरात शेंडा पार्क येथे आयटी पार्क उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव यापूर्वीच मंत्रालयात मंजुरीसाठी गेला आहे. शक्तिपीठ महामार्गासाठीची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. मात्र पुढील आठ दिवसांत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या तालुक्यातून, कोणत्या व किती गावांमधून महामार्ग जाणार आहे हे जिल्हा प्रशासनाला कळणार आहे. त्यानंतर भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

शक्तिपीठ महामार्ग वळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांचा महामार्गाला तीव्र विरोध होता, ज्या तालुक्यांमधील सर्वाधिक बागायती शेती बाधित होणार होती. आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना परत त्यात परिसरातून नवा महामार्ग कशासाठी या तीन मुद्द्यांचा विचार करून महामार्गाचा आराखडा बदलण्यात आला आहे, तो नेमका कसा असेल हे अधिसूचनेतच कळणार आहे. मंगळवारी मात्र मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पांची जिल्ह्यातील माहिती घेतली.

Web Title : मुख्यमंत्री ने कोल्हापुर आईटी पार्क, शक्तिपीठ भूमि अधिग्रहण की जानकारी ली।

Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने कोल्हापुर आईटी पार्क प्रस्ताव और शक्तिपीठ राजमार्ग परियोजना की समीक्षा की। अधिसूचना के बाद भूमि अधिग्रहण विवरण उपलब्ध होगा। कृषि प्रभाव को कम करने के लिए मार्ग बदला गया। विवरण अधिसूचना में।

Web Title : CM reviews Kolhapur IT park, Shaktipeeth land acquisition progress.

Web Summary : Chief Minister Fadnavis reviewed the Kolhapur IT park proposal and Shaktipeeth highway project. Land acquisition details will be available after notification. Route changed to minimize agricultural impact. Details in notification.