शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

आरोग्यास धोका : शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना दुप्पट फायदा

कोपर्डे हवेली : इतर पिकांच्या तुलनेत फळ पिकांना जादा दर मिळत असल्याने सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी फळ उत्पादनाला पसंती दिली आहे. मात्र, दर वाढल्यास कच्ची फळे खरेदी करून व्यापारी रासायनिक पद्धतीने ती पिकवून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेली अशी फळे आरोग्यास हानीकारक ठरत आहेत.शेतकरी केळीचे पीक बारमाही घेतात. काही हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बागांचे नुकसान होऊन शेती तोट्यात जाते़ मात्र, ज्याठिकाणी चांगले उत्पन्न निघाले आहे. तेथील केळीला चांगली मागणी असते़ बाजारपेठेत आवक कमी झाल्यानंतर केळीला चांगला दर मिळतो़ तसेच केळी एकाच वेळी पिकत नसल्याने बागेतील सर्वच घड एकावेळी काढता येत नाहीत़ आठ दिवसांच्या फरकाने केळीचे घड काढले जातात़ मात्र, सध्या व्यापारी शेतामधील माल खरेदी करून एकाच वेळेस केळीचे संपूर्ण घड काढत आहेत. त्यानंतर घडावर रासायनिक प्रक्रिया करून केळी पिकवली जात आहे. परिणामी, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या किती तरी पटीने अधिक व्यापाऱ्यांना फायदा होतो़जागतिक बाजारपेठेत आंब्यालाही चांगली मागणी आहे़ व्यापारी कच्चे आंबे खरेदी करून ज्वलनशील पावडरीचा वापर करून ती पिकवत आहेत़ नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकण्यास जास्त कालावधी लागतो. हा कालावधी वाचविण्यासाठी आणि अल्प वेळात जास्त पैसे मिळण्यासाठी व्यापारी अशा पद्धतीची रासायनिक प्रक्रिया करतात. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेल्या फळाची चव वेगळी असते. अशा फळाचा दुष्परिणाम लगेचच जाणवत नसला तरी भविष्यात त्याचा फटका शरीराला बसतो. (वार्ताहर)विशिष्ट गॅसचा वापररासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवण्याची प्रक्रिया घातक आहे़ फॉस्फरससारखा रासायनिक पदार्थ त्यासाठी वापरला जातो. तसेच विशिष्ट प्रकारचा गॅसही फळांचा साठा असलेल्या ठिकाणी सोडला जातो. फॉस्फरस व त्यासारखे अन्य काही पदार्थ ज्वलनशील समजले जातात. अशा पदार्थांचा वापर केल्यामुळे अतिउष्णतेतून फळे पिकत असली तरी त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.दर वाढताच होते प्रक्रियासर्व बागेतील केळीचे घड उतरविण्यास ३० ते ४० लागतात़ मात्र, शेतकरीही नैसर्गिकरीत्या केळी पिकण्याची वाट न पाहता व्यापाऱ्याला टनाप्रमाणे केळीची विक्री करतात. संबंधित व्यापारी केळी खरेदी करून एकाच वेळी सर्व घड उतरवितात. त्यानंतर ते घड गोडावूनमध्ये ठेवले जातात. तसेच बाजारपेठेत दर वाढला की रासायनिक प्रक्रिया करून त्वरित केळी पिकवली जाते.कशी ओळखायची रासायनिक प्रक्रिया ?नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळी दिसायला उठावदार नसतात. सुरुवातीला हिरवट पिवळा रंग असतो. त्यानंतर हळूहळू केळीवर काळे डाग पडत जातात. मात्र, रासायनिक प्रक्रिया करून पिकविलेली केळीला उठावदार भडक पिवळा रंग असतो. केळीच्या आतील गाभ्याला काळे डागे असतात.