शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले, जंगल सफारीसाठी वनविभागाकडून बसची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 17:03 IST

२००७ मध्ये या उद्यानास राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित केले

अनिल पाटीलसरुड : चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटाकांसाठी शनिवार (दि १५) पासून खुले करण्यात आले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात  निसर्ग पर्यटनासाठी दरवर्षी वाढत असलेली पर्यटंकाची गर्दी लक्षात घेऊन यापुढे चांदोलीतील पर्यटनासाठी पर्यटकांना प्रवासासाठी वनविभागाकडून १७ आसन क्षमतेची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रति पर्यटक १५० रु. तर लहान मुलांसाठी ५० रु प्रवास शुल्क घेवून वन विभागाकडून पर्यटाकांना या बसमधून जंगल सफारी घडवून आणली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी ही बस एक पर्वणीच ठरणार आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागरी  या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर ३१७. ६७ चौरस कि. मी मध्ये पसरलेले चांदोली हे राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे. २००४ मध्ये या अभयारण्याची राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा मिळाला तर मे २००७ मध्ये या उद्यानास राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले. दरवर्षी १५ जुन ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत पावसामुळे उद्यान पर्यटनासाठी बंद ठेवले जाते.विशेषतः जानेवारी ते मे अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये निसर्ग पर्यटनासाठी  या चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांची मोठी गर्दी असते. यावर्षी १६ ऑक्टोंबरला खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते जंगल सफारी बसला हिरवा झेंडा दाखवून तसेच    शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक नानासाहेब लडकत, चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी, सहाय्यक वन संरक्षक गणेश पाटोळे व तुषार ढमढेरे, चांदोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) नंदकुमार नलवडे आदीसह वन विभागाचे कर्मचारी उपस्थितीत होते .विविध प्रजातींच्या प्राण्यांसह, पक्षांचे वास्तव्यचांदोली राष्ट्रीय उद्यानात ३३ प्रजातीचे सस्तन प्राणी, २४४ प्रजातींचे पक्षी, १२० प्रजातींची फुलपाखरे, २२ प्रजातींचे उभयचर प्राणी, ४४ प्रजातींचे सरपटणारे प्राणी आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे.  तर १४५२ प्रकारच्या विविध वनस्पती व ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती या उधानात आढळून येतात.  तर ऐतिहासिक प्रचितगड हा किल्लाही याच उद्यानात आहे 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीtourismपर्यटनforest departmentवनविभाग